#News18RisingIndia : खिलजीनं मला खूप त्रास दिला - रणवीर सिंग

न्यूज18 रायझिंग इंडियाच्या व्यासपीठावर रणवीर सिंगनं प्रेक्षकांसोबत बऱ्याच गोष्टी शेअर केल्या. तो म्हणाला, 'पद्मावत सिनेमाचा वाद सुरू होता, तेव्हा मी खूप सकारात्मक होतो.'

Sonali Deshpande
19 मार्च : न्यूज18 रायझिंग इंडियाच्या व्यासपीठावर रणवीर सिंगनं प्रेक्षकांसोबत बऱ्याच गोष्टी शेअर केल्या. तो म्हणाला, 'पद्मावत सिनेमाचा वाद सुरू होता, तेव्हा मी खूप सकारात्मक होतो. मी नेहमीच पाॅझिटिव्ह आहे. यावेळी फिल्म इंडस्ट्रीचा मला पाठिंबा मिळाला. पद्मावतनं 300 कोटीची कमाई केलीय. आता मी पुढच्या सिनेमाची तयारी करतोय.'या सिनेमाच्या सेटवर हल्ला झाला. सेटचं खूप नुकसान झालं. त्याबद्दल बोलताना रणवीर म्हणाला, मला याचा राग आला. मला आश्चर्याचा धक्काही बसला होता. 2017मध्ये हे सगळं होतंय, याचाच धक्का बसला होता.  मशीन्स, कॅमेरे तोडले गेले. यावर अनेकांचं घर चालतं. रणवीर म्हणाला, ' सिनेमाचा सेट हा एखाद्या मंदिरासारखा असतो.'पद्मावतच्या अल्लाउद्दीन खिलजीच्या भूमिकेबद्दल बोलताना रणवीर म्हणाला, ' खूप त्रास झाला. मी त्या व्यक्तिरेखेत पूर्ण शिरलो होतो. पण आता खिलजी माझ्या सिस्टिमच्या बाहेर आलाय.'

Trending Now