दीपिकानं पहिल्यांदा रणवीरवरच्या प्रेमाची कशी दिली कबुली?

आतापर्यंत दीपिका काही बोलली नव्हती. पहिल्यांदाच तिनं यावर भाष्य केलंय. ती म्हणालीय, तो माझा आहे.

Sonali Deshpande
मुंबई, १८ जून : रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण यांच्या नात्याबद््दल अख्खं जग बोलतंय, पण आतापर्यंत दीपिका काही बोलली नव्हती. पहिल्यांदाच तिनं यावर भाष्य केलंय. ती म्हणालीय, तो माझा आहे.त्याचं झालं असं की रणवीर सिंगनं सोशल मीडियावर आपला एक फोटो टाकलाय. तो इतका सेक्सी आहे की अनेकांची झोपच उडाली. फॅन्सनी विशेषत: मुलींनी यावर अगदी प्रेमभऱ्या कमेंट केल्यात. इतक्या देखण्या रणवीरसाठी अनेक जणी जीव ओवाळायला तयार आहेत.

रणवीर दीपिकाच्या प्रेमात आकंठ बुडालाय, हे तर त्यानं अनेकदा मीडियासमोर सांगितलंय. दोघं नोव्हेंबरमध्ये लग्न करणार आहेत. आणि तशी तयारीही सुरू आहे.

Trending Now