मुंबई, 03 फेब्रुवारी : स्टार प्रवाहवरील रंग माझा वेगळा ही मालिका सध्या टीआरपीच्या शर्यतीत नंबर एक वर आहे. मालिकेतील मोठा ड्रामा नुकताच संपला. अनेक वर्ष विभक्त झालेले कार्तिक आणि दीपा पुन्हा एकत्र आलेत. कार्तिक आणि दीपाचा भव्य विवाह सोहळा मागचा आठवडाभवर दाखवण्यात आला. दीपा कार्तिक एकत्र आल्यानंतर आता तरी मालिका चांगल्या आनंदी ट्रॅकवर येईल असं वाटलं होतं. मात्र दीपानंतर आता कार्तिकचे पुन्हा एखदा रंग बदलताना दिसणार आहे. मालिकेनं आता नवं वळण घेतलं आहे.
कार्तिक बाप होऊ शकत नाही असे खोटे रिपोर्ट श्वेतो तयार करते हो सत्य सर्वांसमोर येतं. तर कार्तिक आणि दीपाच्या संसारात ढवळढवळ करणाऱ्या आयेशाही जेलमध्ये जाते. राधा आई देखील सगळ्या चुकांची कबूली देते. मालिकेत सगळा जुना ड्रामा संपवून कार्तिक आणि दीपा लग्न करतात. मात्र मालिकेत पुन्हा एकदा ट्विस्ट आणत कथानकात मोठा बदल करण्यात आला आहे.
हेही वाचा - Aai Kuthe Kay Karte : लग्नाच्या बोलणीसाठी किती सुंदर नटली अरुंधती; पण शेवटी अनिरुद्धनं जे केलं...
दीपाची मैत्रीण साक्षीचा येणाऱ्या भागात मृत्यू होणार आहे. साक्षीनं दीपाला तिच्या वाईट काळात साथ दिलेली असते. साक्षी कार्तिकला दीपाचा पाठलाग करताना पाहते आणि तू तिच्यावर संशय घेतोयस सांगून त्याच्याशी भांडते. दोघांमध्ये चांगलीच बाचाबाची होते. दीपावर तू अजूनही संशय घेतोयस असं म्हणत दीपासमोर कार्तिकला खडसावते.
कार्तिक दीपावर लपून छपून लक्ष का ठेवत होता असा प्रश्न सर्वांनाच पडलेला असताना आता अचानक साक्षीची मालिकेतून एक्झिट होणार आहे. मालिकेचा प्रोमो समोर आलाय. ज्यात साक्षी हॉस्पिटलमध्ये शेवटच्या घटका मोजत असते. साक्षीला कार्तिकचं माहिती असलेलं सत्य ती दीपाला सांगण्याचा प्रयत्न करत असते मात्र सांगत असतानाच तिला मृत्यू होतो. कार्तिक हा शेवटचा शब्द साक्षीच्या तोंडून निघतो. आता साक्षीला नक्की काय सांगयचं होतं हे येणाऱ्या भागात कळणार आहे.
मालिकेचं बदलेलं कथानक प्रेक्षकांच्या काही पचनी पडलेलं नाही. प्रेक्षकांनी मालिका पुन्हा एकदा ट्रोल केलं आहे. प्रेक्षकांनी म्हटलंय, "आधी सुजय मारला, आता साक्षीला मारताय. What the hell, stop this nonsense, सत्य समोर आणल्यावर तर खूप उच्च दर्जाचा फालतूपणा करताय, बंद करा, बंद करा. प्रेक्षकांवरचा अत्याचार बंद करा".
आणखी एका युझरनं म्हटलंय, "लय फालतू आहे सिरिअल बंद करा काय स्टोरी दाखवतात कायच समजत नाही चांगलं पणे दीपा कार्तिक एकत्र झाले ती श्वेता चा पर्दाफाश झाला आता चांगलं दाखवा की".
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags:Marathi actress, Marathi entertainment, Marathi news, Marathi Serial