...तर दीपिकाच्या आजी-माजी बाॅयफ्रेंड्समध्ये पाहायला मिळाली असती टशन

तख्त हा ऐतिहासिक सिनेमा आहे. सिनेमात रणवीर सिंग आणि विकी कौशलच्या भूमिका आहेत. पण विकीला विचारण्याआधी बाॅलिवूडच्या या मोठ्या स्टारला करणनं सिनेमासाठी विचारलं होतं.

मुंबई, 11 आॅगस्ट : नुकतीच करण जोहरनं तख्त सिनेमाची घोषणा केली. हा मल्टिस्टारर सिनेमा सगळ्यांचंच लक्ष वेधून आहे. ऐ दिल है मुश्कीलनंतर करण पहिला मोठा सिनेमा घेऊन येतोय. तख्त हा ऐतिहासिक सिनेमा आहे. सिनेमात रणवीर सिंग आणि विकी कौशलच्या भूमिका आहेत. पण विकीला विचारण्याआधी बाॅलिवूडच्या या मोठ्या स्टारला करणनं सिनेमासाठी विचारलं होतं.हेही वाचा

Birthday Special : मला डेटिंग करायला आवडतं,पण नातं टिकवता येत नाही - जॅकलीन फर्नांडिस

अजूनही सैफच्या त्या गाण्यावर हसतो अक्षय कुमार

श्रद्धासोबतच्या ब्रेकअपनंतर आता फरहान या मराठमोळ्या अभिनेत्रीच्या प्रेमात

करण जोहरनं रणबीर कपूरला तख्तसाठी विचारलं होतं. पण तारखा उपलब्ध नसल्यानं त्यानं नकार दिला. नाही तर रणवीर सिंग आणि रणबीर कपूरची टशन आपल्याला पाहायला मिळाली असती. गंमतीचा भाग म्हणजे दोघंही दीपिकाचे आजी-माजी प्रियकर. रणबीरला तख्तची स्क्रीप्ट आवडली होती. पण सध्या तो ब्रम्हास्त्र, लवरंजन या सिनेमात बिझी आहे.तख्त ही मुघल काळातली कथा आहे. त्यात रणवीर सिंग, करिना कपूर, आलिया भट्ट, जान्हवी कपूर, अनिल कपूर अशी मोठी स्टारकास्ट आहे.  यात औरंगजेबाचीही व्यक्तिरेखा आहे. आणि ती रणवीर सिंगच करणार अशी चर्चा आहे. त्यामुळे पुन्हा एकदा रणवीरचा खलनायक पाहायला मिळणार आहे. प्रेमासाठी झालेलं युद्ध म्हणजे तख्त असं करणनं म्हटलंय.काही दिवसांपूर्वी करणनं कलंकची घोषणा केली होती.माधुरी दीक्षित आणि संजय दत्तचा सिनेमा कलंकबद्दल खूप उत्सुकता आहे. अर्थात, माधुरी कुठल्या भूमिकेत असेल याबद्दलही तर्कवितर्क लढवले जात होतेच. पण आता माधुरीच्या भूमिकेबद्दल कळलंय. कलंकमध्ये माधुरी वेश्येच्या भूमिकेत आहे. शिवाय ती कथ्थक नृत्यांगनाही आहे.देवदासमध्ये माधुरी दीक्षितनं वेश्या साकारली होती. त्यानंतर आता पुन्हा ती अशाच भूमिकेत दिसणार आहे. कलंक हा पीरियड ड्रामा आहे. त्यात संजय दत्त राजाच्या भूमिकेत असेल.माधुरी आणि संजय दत्त २५ वर्षांनी सिनेमात एकत्र काम करतायत. याशिवाय सिनेमात वरुण धवन, आलिया भट्ट, सोनाक्षी सिन्हा, आदित्य राय कपूर यांच्याही भूमिका आहेत.

Trending Now