रणबीर-आलियाचं अजून एक फोटोशूट, सोडत नाहीत एकमेकांची साथ

कधी रणबीर कपूर म्हणतोय, असं काहीच नाही. तर कधी आलिया रणबीरबद्दल विचारलं तर नुसती स्माईल देते. कधी एकमेकांचे वडील त्यांचं कौतुक करतात. आता सांगा, फॅन्सनी नक्की समजायचं तरी काय?

मुंबई, 29 आॅगस्ट : आलिया भट आणि रणबीर कपूर यांच्या नात्याची सध्या बॉलिवूडमध्ये जबरदस्त चर्चा आहे. मात्र हे दोघेही आता त्यांच्या नात्याबद्दल काहीही उघडपणे सांगायला तयार होत नाहीत. कधी रणबीर कपूर म्हणतोय, असं काहीच नाही. तर कधी आलिया रणबीरबद्दल विचारलं तर नुसती स्माईल देते. कधी एकमेकांचे वडील त्यांचं कौतुक करतात. आता सांगा, फॅन्सनी नक्की समजायचं तरी काय?आता पहिल्यांदाच एका मॅगेझीनसाठी दोघांनी फोटोशूट केलंय. हे दोघेही अयान मुखर्जीच्या ब्रम्हास्त्र सिनेमात एकत्र काम करत असले तरीही एकत्र फोटोशूट करण्याची ही त्यांची पहिलीच वेळ आहे. त्यामुळे त्यांचा हा लूक पाहण्यासाठी त्यांचे फॅन्स आतुर असणार हे काही वेगळं सांगायला नको.मध्यंतरी एका मुलाखतीत रणबीर म्हणाला, ' आलिया आणि माझ्या अफेअरची जी चर्चा आहे, त्यात काही तथ्य नाही. तो एक शो बिझनेस आहे. लोक आज एक कहाणी रचतात, उद्या दुसरी.'

रणबीर म्हणतो, सध्या तो आयुष्य एंजाॅय करतोय. लोकांना त्याच्याबद्दल जे काही बोलायचंय ते बोलू दे.प्रेमाविषयी विचारलेल्या एका प्रश्नाचं उत्तर देताना रणबीर म्हणाला की, जेव्हा व्यक्ती प्रेमात असतो तेव्हा तो काही अद्भूत काम करतो. प्रेमात असणं ही स्वत:मधेच एक सुंदर गोष्ट आहे.आपल्या आणि आलियाविषयी बोलताना रणबीरने हा खुलासाही केला की, आम्ही दोघेही प्राणीप्रेमी आहेत. बऱ्याचदा या दोघांना आपापल्या पाळीव प्राण्यांसोबत फोटो शेयर करताना पाहिलं गेलं आहे.रणबीर आलियाबद्दलची ही चर्चा ब्रम्हास्त्रच्या प्रमोशनचाही भाग असू शकतो.नववधूच्या वेशात कतरिना दिसली सलमानच्या आईसोबत, काय आहे मामला?

Trending Now