राजकुमार रावचा हा व्हायरल व्हिडिओ पाहिलात का?

सध्या राजकुमार रावचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय. एका कारमधून तो उतरतोय आणि पुढे काय होतं हे पाहणं मोठं रंजक ठरेल.

मुंबई, 11 आॅगस्ट : राजकुमार राव सध्या स्त्री सिनेमाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. श्रद्धा कपूर आणि राजकुमार रावचा हा सिनेमा येत्या 31 आॅगस्टला रिलीज होणार आहे. सध्या राजकुमार रावचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय. एका कारमधून तो उतरतोय आणि पुढे काय होतं हे पाहणं मोठं रंजक ठरेल.राजकुमार राव आणि श्रद्धा कपूर सध्या 'स्त्री' सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. याचसाठी राजकुमार राव एका हाॅटेलमध्ये शिरताना दिसतोय. तो अगदी सहज आत एन्ट्री घेणार, इतक्यात सुरक्षा रक्षक त्याला अडवतोय. आणि त्याची पूर्ण तपासणी करतोय. त्यावेळी राजकुमार रावच्या चेहऱ्यावरचे भाव बघण्यासारखे आहेत.

त्यांचा स्त्री सिनेमा सध्या चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी सिनेमाचं कमरिया गाणं रिलीज केलं गेलं. त्यात नोरा फतेहीचे ठुमके पाहायला मिळाले होते. अमर कौशिकनं या सिनेमाचं दिग्दर्शन केलंय.राजकुमार रावची न्यूटनमधली भूमिका गाजली होती. त्यासाठी त्याला राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला होता.वर्षीचा एशिया पॅसिफिक अॅवाॅर्ड मिळालाय. 'न्यूटन'मधल्या भूमिकेसाठी त्याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळालाय. ब्रिसबन इथे हा सोहळा रंगला होता. याच सोहळ्यात न्यूटनला सर्वोत्कृष्ट पटकथेचाही पुरस्कार मिळालाय.पुरस्कार स्वीकारताना राजकुमार म्हणाला, ' चांगली कथा आणि चांगली कामं म्हणून हा पुरस्कार मिळालाय. त्यामुळे हा अॅवाॅर्ड सिनेमाचा आहे.' राजकुमार रावनं हा पुरस्कार आपल्या आईला समर्पित केलाय.

Trending Now