राधिकाच्या आयुष्यात येणार मोठं वळण, मग शनायाचं काय होणार?

गुरूचे बाॅसही त्याच्यावर भडकलेत. त्याची नोकरी कधीही जाऊ शकेल, अशी परिस्थिती आहे. तर दुसरीकडे राधिकाच्या आयुष्यात एक मोठं वळण येणार आहे.

मुंबई, ०९ आॅगस्ट : 'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेत आता बरीच वळणं येऊ घातलीयत. गुरूचा उतरता काळ सुरू झालाय. शनायाही आता वैतागलीय. तिला शाॅपिंग करता येत नाही. म्हणून तर ती गुरूसोबत ब्रेकअप करायचा विचार करतेय. गुरू तर सगळ्या बाजूंनी पिडलाय. गुरूचे बाॅसही त्याच्यावर भडकलेत. त्याची नोकरी कधीही जाऊ शकेल, अशी परिस्थिती आहे. तर दुसरीकडे राधिकाच्या आयुष्यात एक मोठं वळण येणार आहे..एल.एफ.च्या ढासळत्या स्थितीमध्ये कंपनीचे सध्याचे भागीदार.एल.एफ.चे शेअर्स एखाद्या मोठ्या आणि नावाजलेल्या कंपनीला विकायचं ठरवतात. त्यासाठी ते कंपनी शॉर्टलिस्ट करतात त्यातील एक राधिका मसाले ही एक आहे.राधिकाचं तर पूर्ण आयुष्यच बदलून जातं. कारण राधिका आता ए.एल.एफ.ची नवी मालकीण होणार. आतापर्यंत गुरू आणि शनायानं राधिकाचा खूप अपमान केलाय. त्याचा बदला घ्यायची राधिकाला चांगली संधी मिळालीय. शनायाला टेबल पुसायला लावायचं राधिकाचं स्वप्न पूर्ण होणार. ज्या कंपनीत सगळ्यांसमोर राधिकाचा अपमान गुरूनं केला होता. आता त्याच गुरूची ती बाॅस होणार.  राधिकाचा मित्रपरिवार तर खूश आहे. पण तिची सासू तिच्यावर पूर्ण नाराज आहे.

दरम्यान, 'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेतली शनाया म्हणजेच रसिका सुनील आता मालिका सोडणार असंही कळतंय.ही मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर असताना रसिकाचा हा निर्णय निर्मात्यांना पेचात पाडणार अशी चर्चा आहे. फिल्म मेकिंगचा कोर्स करण्यासाठी तिला न्यूयॉर्कला जायचंय.त्यासाठी तिला मालिका सोडणं भाग आहे.या मालिकेत गुरुनाथ आणि राधिका  घटस्फोटासाठी कोर्टात जाणार असल्याचा ट्रॅक सुरु आहे. या महत्वाच्या वळणावर रसिका मालिका सोडून जाणार त्यामुळे आता ही मालिका गाशा गुंडाळणार की रसिकाऐवजी दुसरी अभिनेत्री शनायाची भूमिका साकारणार हे लवकरच कळेल. तरीही सूत्रांच्या माहितीनुसार शनाया ही व्यक्तिरेखा साकारायला दुसऱ्या अभिनेत्रीचा शोध सुरू आहे. कारण इतकी लोकप्रिय व्हिलन कायमस्वरूपी नाहीशी करणार नाहीत, एवढं नक्की.

Trending Now