Birthday Special : जेव्हा राधिका आपटेच्या सिनेमातला न्यूड सीन व्हायरल होतो

राधिका आपटे नेटफ्लिक्सची क्वीन समजली जातेय. नेटफ्लिक्सवर तिचे सिनेमे एकदम हिट असतात. राधिकाचा आज वाढदिवस. 7 सप्टेंबर 1985ला तिचा जन्म. तिनं अभ्यास केला गणिताचा. पण अभिनयाची मूळात आवड. 2005मध्ये वाह लाईफ हो तो ऐसी सिनेमात राधिकानं धोटी भूमिका केली. त्यानंतर 2008मध्ये शोर इन द सिटी सिनेमातल्या तिच्या भूमिकेमुळे ती चर्चेत आली. ती तुषार कपूरसोबत डेट करतेय अशीही चर्चा होती.

त्यानंतर तुषार कपूर आणि राधिकाचं ब्रेकअप झालं. मग तिच्या आयुष्यात एक परदेशी व्यक्ती आली. राधिकानं ब्रिटिश संगीतकार बेनेडिक्ट टेलरशी गुपचूप लग्न केलं. अनुराग कश्यपनं राधिकाला घेऊन एक आंतरराष्ट्रीय सिनेमा बनवला. त्यात एक न्यूड सीन होता. राधिकानं तो केलाही. पण नंतर तो सीन व्हायरल झाला. झाल्या प्रकाराबद्दल अनुरागनं स्वत: पोलिसांमध्ये जाऊन तक्रार केली. पण राधिका बोल्ड होती. तिनं स्वत:वर याचा फार परिणाम होऊ दिला नाही. तिनं नंतरही पार्च्ड सिनेमातही न्यूड सीन दिला.

Trending Now