आधी नकार देऊनही, राधिका आपटेनं का स्वीकारला 'घोल'?

नेटफ्लिक्सवरील सेक्रेड गेम्सनंतर 'घोल" या मिनी सीरीजमध्ये प्रमुख भूमिकेत दिसतेय. ही सिरीज हॉरर क्लासिक प्रकारात मोडते.

मुंबई, 28 आॅगस्ट : काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर 'टू मच ऑफ राधिका आपटे' नावाने अभिनेत्री राधिका आपटेला ट्रोल करण्यात आलं. नेटफ्लिक्सवरील सेक्रेड गेम्सनंतर 'घोल" या मिनी सीरीजमध्ये प्रमुख भूमिकेत दिसतेय. ही सिरीज हॉरर क्लासिक प्रकारात मोडते. राधिका आपटे नेहमीच तिच्यावर कोणतेही आरोप करण्यात आले तर त्याला प्रत्युत्तर देण्यात पटाईत आहे.

याही वेळी राधिका आपटेने एक व्हिडिओ रॅडफ्लिक्ससाठी शूट केलाय. ज्यात ती या ट्रोल करणाऱ्यांचे आभार मानतेय. 'घोल'ची ऑफर जेव्हा आली तेव्हा प्रथम तिने ती नाकारली पण यात अनेक भूमिका करण्याचं आव्हान असल्यामुळे आणि निर्मात्यांनी राधिकाच्याच नावाचा हट्ट धरल्यामुळे अखेर तिने ती स्वीकारली असं राधिका सांगतेय. घोलमध्ये राधिकाच्या बऱ्याच भूमिका आहेत. अगदी गावातली एक साधी बाई ते काॅर्पोरेट आॅफिसमध्ये काम करणारी तरुणी, सामाजिक कार्यकर्ती अशा भूमिका तिनं साकारल्यात.

नेहा धुपियाच्या चॅट शोमध्ये अभिनेत्री राधिका आपटे आणि अभिनेता राजकुमार राव सहभागी झाले होते. त्यावेळी राधिकानं हे सांगितलं. तो सीन करताना मजा आली. मात्र, त्या चित्रपटासाठी माझी निवड झाली नाही, असे तिने सांगितले. चित्रपटात माही गिलने जी भूमिका साकारली होती त्यासाठी राधिकाने ऑडिशन दिली होती.बैलगाडी शर्यतीत आला पहिला, अतिउत्साहात गाडीतून गेला तोल, आणि...! VIDEO

Trending Now