जेव्हा राधिका आपटेला करावा लागतो फोन सेक्स!

'देव डी' या सिनेमाच्या ऑडिशनमध्ये राधिकाला फोन सेक्स करावा लागला असल्याचं तिने सांगितलंय. सर्वात विचित्र ऑडिशन कोणती असा प्रश्न राधिकाला विचारला असता तिने हा धक्कादायक प्रकार उघड केला.

Sonali Deshpande
25 मार्च : अभिनेत्री राधिका आपटे नेहमीच तिच्या धाडसी वक्तव्यामुळे चर्चेत राहिलीये. राधिकाने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत एक धक्कादायक खुलासा केलाय. 'देव डी' या सिनेमाच्या ऑडिशनमध्ये राधिकाला फोन सेक्स करावा लागला असल्याचं तिने सांगितलंय. सर्वात विचित्र ऑडिशन कोणती असा प्रश्न राधिकाला विचारला असता तिने हा धक्कादायक प्रकार उघड केला. माझ्यासाठी हे नवीनच होतं. मी यापूर्वी कधीही असं केलं नाही असंही राधिकाने म्हटलंय.नेहा धुपियाच्या चॅट शोमध्ये अभिनेत्री राधिका आपटे आणि अभिनेता राजकुमार राव सहभागी झाले होते. त्यावेळी राधिकानं हे सांगितलं.  तो सीन करताना मजा आली. मात्र, त्या चित्रपटासाठी माझी निवड झाली नाही, असे तिने सांगितले. चित्रपटात माही गिलने जी भूमिका साकारली होती त्यासाठी राधिकाने ऑडिशन दिली होती. 

Trending Now