It’s Confirm: 'हा' फोटो शेअर करुन प्रियांकाने निकसोबत साखरपुडा केल्याची दिली कबूली

पंजाबी पद्धतीने प्रियांका आणि निकचा रोका संपन्न झाला

मुंबई, १८ ऑगस्ट- प्रियांका चोप्राने सिंगर निक जोनससोबतच्या साखरपुड्याची कबुली दिली आहे. प्रियांकाने इन्स्टाग्रामवर निकसोबतचा फोटो शेअर करत त्यांच्या नात्याला कबुली दिली. फोटोला कॅप्शन देताना प्रियांकाने लिहिले की, ‘आता तो माझाय...’ या फोटोमध्ये प्रियांका आणि निक दोघंही एकमेकांसोबत डोळ्यांच्या भाषेतून बोलत आहेत. प्रियांकाने पिवळ्या रंगाचा पंजाबी ड्रेस घातला आहे तर निकने खास भारतीय पद्धतीने पांढरा कुर्ता- पायजमा घातला आहे. या फोटोमध्ये तिच्या हिऱ्यांच्या अंगठीकडेही अनेकांचे लक्ष जाते. निकनेही हाच फोटो त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. निकने कॅप्शनमध्ये म्हटले की, ‘फ्युचर मिसेस जोनस... माझं हृदय... माझं प्रेम’

प्रियांका आणि निक यांच्या साखरपुड्याचा विषय सध्या बी-टाऊनमध्ये हॉट टॉपिक आहे. आज १८ ऑगस्टला प्रियांकाच्या घरी साखरपुडा आणि रोक्याचा समारंभ झाला. याचसाठी काल रात्री निकचे कुटुंबिय अमेरिकेतून मुंबईत दाखल झाले आहेत. आज सकाळपासूनच प्रियांकाच्या घरचे, साखरपुड्याचे आणि रोका समारंभाचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. प्रियांकाने सोशल मीडियावर कन्फर्म केल्यानंतर ट्विटरवर प्रियांका चोप्रा आणि निक जोनस हे नाव ट्रेण्ड करत आहे.

पंजाबी पद्धतीने प्रियांका आणि निकचा रोका संपन्न झाला. यासाठी पंडितांनाही आमंत्रण देण्यात आले होते. प्रियांकाच्या घरी पोहोचलेल्या पंडितांचा फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले. रोकाआधी घरी एक छोटेखानी पूजा झाली. आज दोन्ही कुटुंबासाठी प्रियांकाने डिनर पार्टीचे आयोजन केले आहे. आजच्या कार्यक्रमाला प्रियांकाची चुलत बहिण परिणीती चोप्राही तिच्या जुहू बंगल्यावर गेली होती.

Trending Now