VIDEO : शाहरूख म्हणतोय, अजून किती प्रेमाच्या 'कसौटी' द्याव्या लागणार?

शाहरूख रोमान्सचा किंग म्हणून ओळखला जातो. यानंच आता प्रोमोमध्ये प्रेरणा आणि अनुरागची ओळख प्रेक्षकांशी करून दिलीय.

मुंबई, 3 सप्टेंबर : गेले बरेच दिवस एकता कपूरच्या 'कसौटी जिंदगी की 2'ची बरीच चर्चा सुरू आहे. 18 वर्षांनी या मालिकेचा सीक्वल बनतोय. आणि त्याच्या प्रमोशनसाठी बोलवण्यात आलंय खुद्द शाहरूख खानला. शाहरूख रोमान्सचा किंग म्हणून ओळखला जातो. यानंच आता प्रोमोमध्ये प्रेरणा आणि अनुरागची ओळख प्रेक्षकांशी करून दिलीय. शाहरूख म्हणतोय, एक जमीन आहे तर दुसरा आसमान. प्रेमाच्या किती 'कसौटी' यांना द्याव्या लागणार आहेत?

एकता कपूर आणि शाहरूख खाननं मिळून या मालिकेचा प्रोमो शूट केलाय. आणि त्यासाठी किती पैसे घेतलेत ठाऊकेय? तब्बल 8 कोटी रुपये. त्यात किंग खाननं एकता कपूरसोबतच्या प्रोमोला 5 कोटी घेतले, तर नंतर तीन प्रोमो केले त्याला 1,1 कोटी घेतलेत.अंध आयुषमान खुरानाला वेगळं काही दिसतंय!इम्तियाज अली घेऊन येतोय राधाकृष्णाची निराळी 'LOVE STORY'अपूर्व असरानीनं केला कंगनावर हल्लाशाहरूख खान या मालिकेसाठी आपला आवाजही देणार आहे. सुरुवातीला एकूणच या मालिकेचा इतिहास शाहरूखच्या आवाजात ऐकायला मिळणार आहे. ही मालिका 25 सप्टेंबरपासून सुरू होतेय.या मालिकेत अनुरागच्या मोठ्या बहिणीच्या भूमिकेत सुमोना चक्रवर्ती आहे.छोट्या पडद्यावर कपिलची बायको म्हणून प्रसिद्ध होती. बडे अच्छे लगते है मालिकेत तिनं राम कपूरच्या बहिणीची भूमिका साकारली होती.कसौटी जिंदगी की ही मालिका 2001मध्ये सुरू झाली होती. आणि ती प्रेक्षकांची लाडकी मालिका बनली. आता हा सीक्वल किती प्रेक्षकांना धरून ठेवतोय, ते कळेल.

Trending Now