#News18RisingIndia : सेन्साॅर बोर्डाचा 'वापर' करून घेणं चुकीचं - प्रसून जोशी

ते म्हणाले, अनेकदा फिल्ममेकर्स सेन्साॅर बोर्डाचा वापर सिनेमाच्या प्रसिद्धीसाठी करतात. ते बरोबर नाही.

Sonali Deshpande
20 मार्च : न्यूज18रायझिंग इंडिया समिटमध्ये मनुष्यविकासबळ मंत्री स्मृती इराणी आणि अभिनेत्री कंगना दोघांनीही सेन्साॅर बोर्डाचे अध्यक्ष प्रसून जोशींबद्दल चांगलं वक्तव्य केलं. प्रसून जोशींनीही सर्व प्रश्नांना मनमोकळी उत्तरं दिली. ते म्हणाले, अनेकदा फिल्ममेकर्स सेन्साॅर बोर्डाचा वापर सिनेमाच्या प्रसिद्धीसाठी करतात. ते बरोबर नाही.प्रसून जोशी म्हणाले, ' सेन्साॅर बोर्ड आपलं काम प्रामाणिकपणे आणि निष्ठेनं करतं.' ते म्हणाले, जगभर देशांमध्ये आपल्या सेन्साॅर बोर्डासारख्या संस्था कार्यरत अाहेत. प्रत्येक देशात चांगले सिनेमे बनतात. ते सिनेमे बघूनच आम्ही मोठे झालोत. पण त्या सिनेमांनाही सेन्साॅर असतं.सेन्साॅर बोर्डाचा 'वापर' करून घेणं चुकीचं आहे, असं प्रसून जोशी म्हणाले.

Trending Now