कपिल शर्मा परत येतोय!

तो आला की लोकांना हसायला मिळतं. बरोबर ओळखलंत. कपिल शर्मा परत येतोय.

मुंबई, 30 आॅगस्ट : तो परत येतोय. त्याच्याबद्दल बरेच वाद झाले. चर्चा झाल्या. टीका झाल्या. त्याच्या आजाराबद्दलही बातम्या आल्या. तरीही लोक त्याची वाट पाहतायत. कारण तो आला की लोकांना हसायला मिळतं. बरोबर ओळखलंत. कपिल शर्मा परत येतोय.कपिल शर्माचा शो पुन्हा एकदा सुरू होतोय. याही वेळी तो चॅटच्या स्वरूपात असेल. थोडेफार बदल असतील. पण कपिल पुन्हा एकदा उभा राहिलाय. रक्षाबंधनला तो आपल्या कुटुंबाला येऊन भेटला.याच दरम्यान कपिल निर्माता म्हणूनही दिसणार आहे.‘सन आॅफ मनजीत सिंग’ हा पंजाबी चित्रपट कपिल प्रोड्यूस करतोय. आॅक्टोबर महिन्यात हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

कपिल शर्माचा शो सोनी वाहिनीनं बंद केला होता. कपिल आणि सुनील ग्रोव्हर यांच्या भांडणानंतर हा शो बंद होणार अशा खूप चर्चा रंगल्या. सरतेशेवटी हा शो बंद झालाच. अर्थात, सोनीनं कपिल शर्मा शो बंद करताना छोट्या ब्रेकनंतर पुन्हा एकदा हा शो परत येईल असं म्हटलं होतं.कपिल शर्माची तब्येत बरी नसते. त्यामुळे हा शो तात्पुरता बंद होतोय, असंही म्हटलं होतं. पण खरी कारणं वेगळी आहेत. कपिल आणि त्याच्या टीममध्ये वितुष्ट आल्यानंतर या शोचा टीआरपी कमी झाला. त्यामुळे वाहिनीनं हा निर्णय घेतला होता.VIDEO : शिवराज सिंग 'बाहुबली' तर ज्योतिरादित्य 'भल्लादेव'

Trending Now