बिग बाॅस 12 : सलमान खानचा सरकारी बाबू पाहिलात का?

दस का दम शो नंतर आता सलमान खान घेऊन येतोय बिग बाॅसचा 12वा सीझन. या सीझनमध्येही ट्विस्ट आहे. आणि वेगवेगळ्या विचित्र जोड्या असणार आहेत.

मुंबई, 26 आॅगस्ट : दस का दम शो नंतर आता सलमान खान घेऊन येतोय बिग बाॅसचा 12वा सीझन. या सीझनमध्येही ट्विस्ट आहे. आणि वेगवेगळ्या विचित्र जोड्या असणार आहेत. त्याबद्दलच सलमान खान सांगतोय नव्या प्रोमोमध्ये. या प्रोमोमध्ये सलमान खान सरकारी बाबू बनलाय. सरकारी महिला कर्मचारी आणि शिपाई यांची जोडी प्रोमोमध्ये दिसतेय. सलमान त्याबद्दलच सांगतोय. सरकारी आॅफिसचं लोकेशन आहे.

रियॅलिटी शोजमध्ये लोकप्रिय असलेला बिग बॉस पुन्हा एक नवीन सिझन घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. दरवर्षी ऑक्टोबरमध्ये येणारा बिग बॉसचा शो यावर्षी मात्र एक महिनापूर्वीच येत आहे. यावर्षी १२वा सिझन असल्याने 15सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे. प्रत्येक वेळेस या कार्यक्रमाची एक नवीन थीम ठेवली जाते. यावर्षीची थीमसुद्धा अशीच नवीन आणि रंजक असणार आहे. यावेळी बिग बॉसच्या घरात जोड्यांना एन्ट्री दिली जाणार आहे.VIDEO : सुप्रिया सुळेंनी बांधली भावाला राखी

Trending Now