'पुढचं पाऊल'मध्ये येणार नवी कल्याणी

समीर कल्याणी नावाच्या एका बारडान्सरला भेटतो आणि त्याच्या आयुष्याला अनपेक्षित वळण मिळतं.

Sonali Deshpande
26 एप्रिल : गेली पाच वर्षं प्रेक्षकांच्या मनावर गारूड केलेल्या 'पुढचं पाऊल' या स्टार प्रवाहवरच्या  मालिकेत आता प्रेक्षकांना नवा धक्का बसणार आहे. कल्याणीच्या मृत्यूचा धक्का बसलेल्या अक्कासाहेबांच्या कुटुंबात नवी कल्याणी येणार आहे.बाब्याने घेतलेल्या बदल्यात झालेला कल्याणीचा मृत्यू अक्कासाहेब पचवू शकलेल्या नाहीत. कुटुंबातील कुणीच कल्याणीची जागा घेऊ शकत नाही असं त्यांचं मत असतं. इतके दिवस तत्त्वाला धरून वागणाऱ्या अक्कासाहेब, आता व्यावहारिक होण्याचं ठरवतात. अक्कासाहेबांच्या या नव्या रूपानं कुटुंबातील प्रत्येकजण अवाक् झाला आहे.इतक्यातच समीर कल्याणी नावाच्या एका बारडान्सरला भेटतो आणि त्याच्या आयुष्याला अनपेक्षित वळण मिळतं.

आता ही नवी कल्याणी कोण आहे, तिचा नक्की हेतू काय, समीर- कल्याणीच काही नवं नातं तयार होईल का ? असे अनेक प्रश्न प्रेक्षकांना पडणार आहे.कल्याणी बार डान्सरच्या भूमिकेत आहे अभिनेत्री माधुरी देसाई.

Trending Now