आता सलमानसोबत भन्साळी आणि दीपिका बोलणार 'इन्शाअल्लाह'

बॉलिवूडमध्ये तीन खानांसोबत चित्रपट मिळणं हे अभिनेत्रींसाठी खूप भाग्याचं समजलं जातं. दीपिकाने आत्तापर्यंत किंग खान शहारुखसोबत अनेक चित्रपट केलेत. पण सलमानसोबत तिने अजून एकही चित्रपट केलेला नाही. बऱ्याच दिग्दर्शकांनी सलमान आणि दीपिकाला घेऊन चित्रपट करण्याचे ठरवले होते. पण अजून ते कुणाला शक्य झालं नव्हतं. मध्यंतरी अशाच चर्चा सुरू होत्या की संजय लीला भंसाळी या दोघांना एकत्र आणून एक चित्रपट करणार आहे. आता हे सत्यात उतरताना दिसत आहे.

भन्साळींनी हिंदुस्थान टाइम्सला दिलेल्या मुलाखतीनुसार सलमान आणि दीपिका त्यांच्या आगामी ‘इंशाअल्लाह’ या चित्रपटात एकत्र काम करणार आहेत. सध्या या चित्रपटावर काम सुरू आहे आणि 2019ला याचे चित्रीकरण सुरू होण्याची शक्यता आहे. सलमानने भन्साळींसोबत हम दिल दे चुके सनम, खामोशी आणि सावरीया या चित्रपटात काम केले आहे. सध्या तो 'भारत'च्या चित्रीकरणात व्यस्त आहे. आणि त्यानंतर तो सोहेल खानचा शेर खान हा चित्रपट करणार आहे. नुकतेच दीपिकासोबत भन्साळींनी तीन ब्लॉकबस्टर हिट चित्रपट केले आहेत.

Trending Now