सनी देओलच्या पडद्यावरच्या मुलाची धडधड का वाढलीय?

सनी देओलच्या गदर सिनेमात त्याच्या मुलाची भूमिका करणारा उत्कर्ष शर्मा तुम्हाला आठवतोय का? त्याचाच सिनेमा आता रिलीजसाठी सज्ज आहे.

मुंबई, 23 आॅगस्ट : सनी देओलच्या गदर सिनेमात त्याच्या मुलाची भूमिका करणारा उत्कर्ष शर्मा तुम्हाला आठवतोय का? त्याचाच सिनेमा आता रिलीजसाठी सज्ज आहे. आणि योगायोग म्हणजे त्याचेच वडील अनिल शर्मा म्हणजे गदरचे दिग्दर्शक त्याला लाँच करतायत. उत्कर्ष सनी देओलचा फॅन आहे. पण या सिनेमात त्याच्या बरोबर नवाजुद्दीन सिद्दीकी आहे. उत्कर्ष सांगतो, नवाजकडून बरंच काही शिकायला मिळालं.पण नवाज काही वेगळंच सांगतोय. तो म्हणतो, 'उत्कर्ष चांगला अभिनेता आहे. शूटिंग दरम्यान मीच त्याच्याकडून बरंच काही शिकलोय. मी शांतपणे त्याचं निरीक्षण करायचो. पण त्याला हे कधी कळलं नाही.' नव्या कलाकारांकडून शिकायला मिळतं, असं नवाज सांगतो.'जिनियस' सिनेमात उत्कर्षबरोबर इशिता चौहान आहे. ही एक रोमँटिक गोष्ट आहे. यात नवाजप्रमाणे आयेशा झुल्का, मिथुन चक्रवर्तीही आहेत. उत्कर्ष म्हणतो, 'माझी धडधड वाढलीय. बाॅक्स आॅफिसवर काय होतंय, हे महत्त्वाचं आहे.'

जिनियसचं स्क्रीनिंग सेलिब्रिटींसाठी ठेवलंय. त्याला धर्मेंद्र, हेमा मालिनी, सनी देओल, बाॅबी देओल उपस्थित राहणार आहेत.

Trending Now