असा रंगला बाॅलिवूडचा रक्षाबंधन सोहळा

अनेक सितारे आपल्या भावंडांबरोबरचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करतायत. अभिषेक बच्चन, सोनम कपूर, प्रियांका चोप्रा असे बरेच जण रक्षाबंधन जोरदार साजरं करतायत.

मुंबई, 26 आॅगस्ट : आज सगळीकडे रक्षाबंधनाचा सण जोरात सुरू आहे. अख्खं बाॅलिवूडही यात समील झालंय. सेलिब्रिटींच्या घरीही आज आनंदाचं वातावरण आहे. अनेक सितारे आपल्या भावंडांबरोबरचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करतायत. अभिषेक बच्चन, सोनम कपूर, प्रियांका चोप्रा असे बरेच जण रक्षाबंधन जोरदार साजरं करतायत.

अभिषेक बच्चननं श्वेता बच्चनसोबतचा लहानपणीचा फोटो शेअर केलाय. पार्टनर इन क्राइम असंही त्यानं त्यावर लिहिलंय.

दीपिका पदुकोणनं आपली बहीण अनिषाबरोबरचा फोटो इन्स्ट्राग्रामवर टाकलाय.

बाॅलिवूड अभिनेत्री सोनम कपूरनं आपल्या कुटुंबातल्या भावांचे फोटो शेअर केलेत. त्यात हर्षवर्धन कपूर आणि अर्जुन कपूरही दिसतायत.आपण राखी बांधायला उपस्थित नाही,याबद्दल तिनं दिलगिरीही व्यक्त केलीय.

अभिषेक बच्चनला श्वेता बच्चन राखी बांधतेय, हे फोटोही व्हायरल झालेत.

अर्जुन कपूरनं बहीण अनुशालाबरोबरचा लहानपणीचा फोटो शेअर केलाय.

तर प्रियांका चोप्रानंही आपल्या भावासोबतचा फोटो शेअर केलाय.बाॅलिवूडनं आज सोशल मीडियावर रक्षाबंधनचा सोहळा साजरा केला.PHOTOS : राज ठाकरेंच्या घरी झालं रक्षाबंधन साजरं

Trending Now