अमिताभ बच्चन यांनी सिनेमा पाहण्यासाठी केलं अख्खं थिएटर बुक!

आता एखाद्याला सिनेमा पाहायचा असेल तर काय करेल? तिकीट काढून थिएटरमध्ये जाईल. पण बिग बींनी तसं केलं नाही. त्यांनी चक्क एक थिएटरच बुक केलं.

News18 Lokmat
मुंबई, 03 आॅगस्ट : सध्या अमिताभ बच्चन, रणबीर कपूर,आलिया भट्ट बल्गेरियात ब्रम्हास्त्र सिनेमाचं शूटिंग करतायत. सिनेमाचं शूटिंग जोरदार सुरू आहे. त्याच्या अपडेट्स बिग बी नेहमीच सोशल मीडियावर शेअर करत असतात.  बाॅलिवूडच्या या महानायकाला सिनेमावर खूप प्रेम आहे. सिनेमा हे त्यांच्यासाठी एक पॅशन आहे. ब्रम्हास्त्रच्या वेळीही बिग बींचं हे सिनेमाप्रेम दिसलं. आता एखाद्याला सिनेमा पाहायचा असेल तर काय करेल? तिकीट काढून थिएटरमध्ये जाईल. पण बिग बींनी तसं केलं नाही. त्यांनी चक्क एक थिएटरच बुक केलं.

हो, अमिताभ बच्चन यांना मिशन इम्पाॅसिबल बघायचा होता. त्यासाठी त्यांनी अख्खं थिएटरच बुक केलं. त्यांच्या सोबत होता रणबीर कपूर. अख्ख्या थिएटरमध्ये दोघं आणि काही तुरळक लोक दिसतायत. आलिया भट्टचा काही पत्ता नव्हता. बिग बींनी आपल्या इन्स्ट्राग्रामवर हे फोटोज शेअर केलेत.ब्रम्हास्त्रच्या शूटिंगला सगळे कलाकार खूप धमाल करताना दिसतायत. शूटिंग संपलं की मग एकच कल्ला होतोय. अमिताभ बच्चन हे सध्या त्यांच्या 'ब्रम्हास्त्र' सिनेमाच्या शूटिंगसाठी बल्गेरियात आहेत. तिथे असलेल्या धुंद वातावरणात सेटवरील कुणीतरी इथं मस्त गरमागरम समोसे आणि वडापाव खायला मिळाला तर काय मज्जा येईल अशी इच्छा व्यक्त केली होती.  बिग बींनी लगोलग ही इच्छा पूर्ण करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्यांनी कूकला सांगून संपूर्ण क्रूसाठी गरमा गरम वडापाव आणि सामोसे बनवायला सांगितले. त्यानंतर स्वतः सोशल मीडियाद्वारे ही बातमी आपल्या फॅन्सनाही सांगितली. सेटवर सगळ्यांनी त्याच्यावर मस्त ताव मारला.बल्गेरियात सध्या ब्रम्हास्त्र सिनेमाचं शूटिंग सुरू आहे. रणबीर कपूर, आलिया भट्ट यांच्या भूमिका सिनेमात आहेत. या सिनेमाचं शूटिंग सुरू असताना, रणबीर आणि आलिया यांचं नातं गहिरं झालंय.ब्रम्हास्त्र सिनेमा एक रोमँटिक कथा आहे आणि त्याला सुपरनॅचरल शक्तीची जोड आहे. रणबीर आणि आलिया यांचा रोमान्स सिनेमात पहायला मिळणार आहेच. पण त्याशिवाय अमिताभ बच्चन यांची हटके भूमिका या सिनेमात असेल.

Trending Now