PHOTOS : नागराज मंजुळे,आर्ची-परश्या मनसेच्या चित्रपट सेनेत !

अवघ्या जगाला याड लावणारे सैराटचे दिग्दर्शक नागराज मंजुळे आपल्या स्टार जोडीला घेऊन अखेर राजकीय पक्षात पोहोचले. सैराट चित्रपटाचे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेत दाखल झाले आहे. त्यांच्यासोबत अभिनेत्री रिंकू राजगुरू आणि अभिनेता आकाश ठोसर यांनीही महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेचं सदस्यत्व स्वीकारलंय.

आज दुपारी नागराज मंजुळे यांच्यासह दोघांचा महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेत सदस्यत्वाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी मनचिसेचे अध्यक्ष अमेय खोपकर आणि सरचिटणीस शशांक नागवेकर, उपाध्यक्ष शर्वणी पिल्लई आणि उमा सरदेशमुख यांच्या उपस्थितीत चित्रपट सेनेचे सभासत्व स्वीकारले नागराज मंजुळे यांच्या सैराट चित्रपट मराठी चित्रपटसृष्टीत मैलाचा दगड ठरलाय. या चित्रपटाने बाॅक्सआॅफिसवर छप्पर फाडके कमाई केलीच. तसंच या चित्रपटाचे अनेक भाषेतही रिमेक निघाले. 

Trending Now