शनाया घेणार गुरूचा कायमचा निरोप

त्यातली शनाया ही नेहमीच लोकप्रिय ठरलीय. व्हिलन असली तरी तिची भूमिका लोकांना आवडते. तिचा मूर्खपणा, अल्लडपणा लोक एंजाॅय करतात. अर्थात, याचं श्रेय रसिका सुनीलला दिलं पाहिजे.

मुंबई, 06 आॅगस्ट : माझ्या नवऱ्याची बायको ही सध्या घराघरात पाहिली जाणारी मालिका. सध्या गुरुनाथ आणि राधिका यांच्या घटस्फोटाचा ट्रॅक सुरू आहे. त्यात रंगत वाढत चाललीय. त्यातली शनाया ही नेहमीच लोकप्रिय ठरलीय. व्हिलन असली तरी तिची भूमिका लोकांना आवडते. तिचा मूर्खपणा, अल्लडपणा लोक एंजाॅय करतात. अर्थात, याचं श्रेय रसिका सुनीलला दिलं पाहिजे. एवढी मोठी भूमिका असलेली तिची ही पहिलीच मालिका. पण तुम्हाला एक बातमी माहितीये का? ही शनाया गुरूच्या आयुष्यातून कायमची बाहेर पडतेय.'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेतली शनाया म्हणजेच रसिका सुनील आता मालिका सोडणार असं कळतंय.ही मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर असताना रसिकाचा हा निर्णय निर्मात्यांना पेचात पाडणार अशी चर्चा आहे. फिल्म मेकिंगचा कोर्स करण्यासाठी तिला न्यूयॉर्कला जायचंय.त्यासाठी तिला मालिका सोडणं भाग आहे.या मालिकेत गुरुनाथ आणि राधिका  घटस्फोटासाठी कोर्टात जाणार असल्याचा ट्रॅक सुरु आहे. या महत्वाच्या वळणावर रसिका मालिका सोडून जाणार त्यामुळे आता ही मालिका गाशा गुंडाळणार की रसिकाऐवजी दुसरी अभिनेत्री शनायाची भूमिका साकारणार हे लवकरच कळेल. तरीही सूत्रांच्या माहितीनुसार शनाया ही व्यक्तिरेखा साकारायला दुसऱ्या अभिनेत्रीचा शोध सुरू आहे. कारण इतकी लोकप्रिय व्हिलन कायमस्वरूपी नाहीशी करणार नाहीत, एवढं नक्की.

हेही वाचा

PHOTOS : 'नागिन 3'फेम सुरभीचे हाॅट फोटोज व्हायरल

सलमाननंतर बाॅलिवूडच्या 'या' मोठ्या दिग्दर्शकाला प्रियांकानं दिला धोका

सलमानची पसंत वारिना हुसेनचं आयुष्य आहे कसं?

सध्या तुझं माझं ब्रेकअप ही मालिका संपतेय. आणि तिच्या जागी तुला पाहते रे सुरू होतेय. त्यात सुबोध भावे मुख्य भूमिकेत आहे.ईशा आणि विक्रम सरंजामे यांच्या प्रेमाची ही कथा आहे. त्यात विक्रम हा मोठ्या वयाचा दाखवलाय. सुबोध भावेसारख्या दिग्गज अभिनेत्याबरोबर काम करायला संधी मिळणारी ही अभिनेत्री आहे कोण, याबद्दल सगळ्यांना उत्सुकता आहे.तर ही आहे गायत्री दातार. 'तुला पाहते रे' मालिकेतू तिचं पहिल्यांदाच पदार्पण होतंय. गायत्री सांगते, ' ती ईशा निमकर नावाच्या मुलीची भूमिका साकारतेय. ही मुलगी फार हुशार नाही आणि फार ढसुद्धा नाही. तिचे वडील एकदम साधे आणि देवभोळे आहेत. ती तिच्या वडिलांच्या एकदम जवळ आहे.'ती म्हणते, ' मी सुबोध भावेसोबत काम करतेय, ही माझ्यासाठी मोठी भाग्याची गोष्ट आहे. एवढ्या मोठ्या कलाकाराबरोबर काम करायला मिळणं ही तुमच्या करियरसाठी सकारात्मक गोष्ट आहे.' 

Trending Now