PHOTOS : मानस-वैदेहीच्या लग्नाचा हा अल्बम पाहिलात का?

होणार होणार म्हणताना अखेर 'फुलपाखरू' या सुपरहिट मालिकेतील मानस आणि वैदेही या जोडीचं लग्न लागलं. या लग्नाची त्या दोघांएवढेच त्यांचे मित्रही आतुरतेने वाट पहात होते.कॉलेजपासून सुरू झालेल्या या दोघांची मैत्री आता लग्नापर्यंत येऊन पोहोचलीय. त्यामुळे त्यांच्या नात्याला आणि पर्यायाने मालिकेला आता नवं वळण मिळणारे. कॉलेजच्या दिवसांमध्ये फुललेलं प्रेम आता चक्क लग्नापर्यंत येऊन ठेपलं.मानस वैदेहीच्या नात्यात हा दिवस अनेक कारणांसाठी खास आहे. कारण या क्षणाची ते गेले कित्येक दिवस वाट पहात होते.फुलपाखरू या मालिकेतील ही सुपरहिट जोडी नुकतीच बोहल्यावर चढली. याची सुरूवात झाली ती लग्नाच्या खरेदीपासून.मानस आणि वैदेहीच्या लग्नात ते सगळ्यात सुंदर दिसावेत यासाठी लग्नाची खास खरेदी करण्यात आली.

त्यानंतर वेळ आली ती व्याही भोजनाची. दोघांच्याही घरची मंडळी यानिमित्ताने एकत्र आली आणि या दोघांप्रमाणेच त्यांचेही एकमेकांसोबतचे ऋणानुबंध कायमचे जुळले. त्यानंतर वैदेहीची मेहेंदी सेरिमनीही तेवढीच खास ठरली. यानिमित्ताने जमलेल्या तिच्या मैत्रिणींनी हे क्षण चांगलेच एन्जॉय केले, तर वैदेहीनेही तिच्या हातावर सुरेख मेहंदी काढली. मात्र या लग्नात खरी मजा आली ती संगीत सेरिमनीला. खरं तर मराठी लग्नात हा प्रकार नसतो. पण मालिका म्हंटल्यावर सगळं माफ करावं लागतं.मानस वैदेहीच्या कट्टा गँगवरील मित्र मैत्रिणींनीही या संगीत सेरिमनीत चांगलीच धमाल केली. अखेरीस दिवस आला तो या दोघांच्या लग्नाचा.आपल्या माहेरच्या माणसांना कायमचं सोडून जाताना वैदेहीला फार वाईट वाटत होतं. वडिलांचा निरोप घेताना वैदेहीच्या अश्रूंचा बांध फुटला. लग्नानंतर या मालिकेत आता कोणता नवा ट्विस्ट येतो याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. 

Trending Now