अशी घडली 'मोरूची मावशी'

चार दशकांहूनही अधिक काळ नानाविध भूमिका साकारून रसिकांना हसायला लावणारा एक चतुरस्त्र नट आज काळाच्या पडद्या आड गेला. मुलुंडच्या फोर्टिस रुग्णालयात पहाटे ४ वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मोरूची मावशी होऊन आपलं काम प्रामाणिकपणे करणाऱ्या चव्हाण यांना संपूर्ण सिनेसृष्टी विजय मामा या नावानेच ओळखायची. कधीही कोणाबद्दल वाईट बोलणं नाही ही त्यांची खासियत होती. चव्हाण यांचा जन्म लालबागमध्ये झाला. सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातील विजय चव्हाण लालबागमधील प्रसिद्ध भारतमाता चित्रपटगृहाच्या मागच्या बाजूला असलेल्या हाजी कासम चाळीत लहानाचे मोठे झाले.

रुपारेल कॉलेजमधून चव्हाण यांनी त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले. कॉलेजमध्ये असल्यापासूनच विजय अनेक एकांकिका आणि इतर अभिनयाच्या स्पर्धांमध्ये उत्साहाने भाग घ्यायचे. त्यांना पहिल्यांदा काम करायला मिळालेल्या एकांकिकेचा किस्साही रंजक आहे. चव्हाण यांना त्यांची पहिली एकांकिका त्यांचे जवळचे मित्र विजय कदम यांच्यामुळे मिळाली. एकांकिकेमध्ये भाग घेणारा स्पर्धक ऐनवेळी काही कारणास्तव येऊ शकला नव्हता. पण त्या एकांकिकेच्या रंगीत तालमींना विजय चव्हाण आवर्जुन उपस्थित राहायचे. त्यामुळे या एकांकिकेतील सगळे संवाद त्यांना पाठ होते. विजय चव्हाण एकांकिकेतील भूमिका चांगल्याप्रकारे वठवू शकतात असा विश्वास विजय कदम यांना होता. त्यामुळेच त्यांनी दिग्दर्शकाला चव्हाण यांचे नाव सुचवले. यानंतर कॉलेजच्या अनेक एकांकिकांमध्ये त्यांनी सहभाग घेतला. मोरूची मावशी हे विजय चव्हाण यांच्या कारकिदीर्तील सगळ्यात गाजलेले नाटक. या नाटकात त्यांनी मोरूची मावशी अप्रतिम रंगवली. लक्ष्मीकांत बेर्डेमुळे विजय यांना हे नाटक मिळाले. लक्ष्मीकांत यांनी या नाटकात काम करावं अशी साऱ्यांची इच्छा होती. मात्र प्रायोगिक रंगभूमीवर चव्हाण हे नाटक करत असल्यामुळे व्यावसायिक नाटकामध्येही चव्हाणच योग्य असल्याचं बेर्डे यांनी निर्मात्यांना सांगितलं. विजय चव्हाण यांनी आतापर्यंत ३५० ते ४०० सिनेमांमध्ये काम केले आहे. मोरूची मावशी, श्रीमंत दामोदर पंत ही त्यांची नाटकं प्रचंड गाजली आहेत. १९८५ मध्ये वहिनीची माया या सिनेमातून त्यांनी सिनेसृष्टीत पदार्पण केले. झपाटलेला, पछाडलेला, भरत आला परत यांसारख्या अनेक विनोदी सिनेमातील त्यांच्या भूमिका प्रचंड गाजल्या. अनेक पुरस्कारांनी नावाजले गेलेल्या चव्हाण यांना २०१८ चा चित्रपती व्ही. शांताराम पुरस्कार घोषित करण्यात आला.शी ह

Trending Now