मलाइका म्हणतेय 'हॅल्लो हॅल्लो', VIDEO व्हायरल

मुन्नीचा विसर पडेल असं गाणं घेऊन आलीय मलाइका अरोरा

मुंबई, 5 सप्टेंबर : मलाइका अरोराचे लटके झटके नेहमीच लोकप्रिय ठरलेत. मलाइकाची मुन्नी तर अजूनही लक्षात आहे. पण आता मुन्नीचा विसर पडेल असं गाणं घेऊन आलीय मलाइका अरोरा.पटाखा सिनेमातलं हॅल्लो हॅल्लो हे आयटम साँग रिलीज झालंय. त्यात मलाइकानं ठुमके बघण्यासारखे आहेत. तिनं काळ्या रंगाची घागरा चोली घातलीय. मलाईकाचं एकदम हाॅट लूक आहे. गाण्याला आवाज दिलाय रेखा भारद्वाजनं. तर गणेश आचार्यनं कोरिओग्राफी केलीय.विशाल भारद्वाज आपला सिनेमा पटाखा आधी छुरियाँ नावानं रिलीज करणार होता. पण नंतर ते बदललं. सिनेमात सुनील ग्रोव्हर, सान्या मल्होत्रा, राधिका मदान और विजय राज  यांच्या भूमिका आहेत.

मध्यंतरी, विशाल भारद्वाजनं सांगितलं, 'मला प्रियांकाबरोबर काम करण्याची इच्छा होती. तिलाही माझ्याबरोबर काम करायचं होतं. प्रियांका माझ्याबरोबर पुढच्या वर्षी एक सिनेमा करेल. मी या प्रोजेक्टवर एक वर्ष काम करतोय. प्रियांकाला समोर ठेवूनच मी स्क्रीप्ट लिहिलंय.'प्रियांका चोप्रानं विशाल भारद्वाजसोबत कमिने, सात खून माफ हे सिनेमे केलेत. त्यामुळे आता तिच्या नव्या सिनेमाबद्दल खूप उत्सुकता आहे.

Trending Now