अनुराग कश्यपसाठी 'या' अभिनेत्रीनं केला न्यूड सीन!

सध्या अनुराग कश्यप सेक्रेड गेम्सची खूपच चर्चा आहे. या वेब सीरिजमध्ये सैफ अली खान आणि नवाजुद्दीनची भूमिका आहे. पण चर्चा आहे ती कुब्रा सायतच्या कुक्कू या व्यक्तिरेखेची.

मुंबई, 12 जुलै : सध्या अनुराग कश्यप सेक्रेड गेम्सची खूपच चर्चा आहे. या वेब सीरिजमध्ये सैफ अली खान आणि नवाजुद्दीनची भूमिका आहे. पण चर्चा आहे ती कुब्रा सायतच्या कुक्कू या व्यक्तिरेखेची. कुक्कू तृतीयपंथी आहे. आणि या वेब सीरिजमध्ये कुब्राला न्यूड सीन करायचा होता. नवाजुद्दीनला कुक्कू मुलगी नसून  मुलगा असल्याचं कळतं. याच शाॅटमध्ये तिला विवस्त्र व्हायचं होतं.टाईम्स नाऊला दिलेल्या मुलाखतीत कुब्रा म्हणाली, 'या सीनसाठी अनुरागनं मला तयार केलं. अनुराग म्हणाला, अशा व्यक्तीची आठवण काढ ज्याच्यावर तू खूप प्रेम करतेस, पण तो तुला मिळत नाही. मग त्यानं इतरांना सांगितलं की इथे कोणी बोलणार नाही.'हेही वाचा

जेव्हा सचिन तेंडुलकरला एकाच दिवशी बसतात दोन धक्के

जिमचा व्यवसाय करून कमवा लाखो रुपये, ही आहे संपूर्ण प्रोसेस

विषारी सापासोबत खेळतानाचा काँग्रेस नेत्याचा VIDEO व्हायरलकुब्रा म्हणाली, ' तो शाॅट सात वेळा शूट झाला. तो दर वेळी मला साॅरी म्हणत होतो. शेवटच्या शाॅटला मी जमिनीवर पडलेच. शाॅट संपला तेव्हा सगळे टाळ्या वाजवत होते. पण उठू शकले नाही. मी रडतच होते. 'कुब्रा म्हणते, ते दृश्य शूट झाल्यावर जेव्हा स्क्रीनवर पाहिलं तेव्हाच मला त्यातलं सौंदर्य कळलं.या वेबसीरिजचं दिग्दर्शन अनुराग कश्यप आणि विक्रमादित्य मोटवानी यांनी केलंय. यात सैफ अली खान, नवाजुद्दीन, राधिका आपटे, पंकज त्रिपाठी यांच्या भूमिका आहेत. 

Trending Now