स्टार्सची ही दोन मुलं बाॅलिवूडच्या वाटेवर

धडक चित्रपटातून पदार्पण करणारी जान्हवी कपूरची सर्वत्र चर्चा असतानाच, तिची धाकटी बहीण खुशी कपूरची सुद्धा चर्चा सुरू झालीये.

News18 Lokmat
मुंबई, 28 आॅगस्ट : अभिनेत्री श्रीदेवीच्या निधनानंतर तिच्या दोन मुली जास्त प्रकाशझोतात आल्या. जान्हवी तर धडक सिनेमामुळे सर्वांना माहीत झाली. शिवाय करण जोहरनं आता तिला तख्त सिनेमातही घेतलंय. जान्हवीकडे सिनेमांची रांगच लागलीय. पण आता तिच्या बहिणीला लाँच करायचा विडाही करण जोहरनं उचललाय.धडक चित्रपटातून पदार्पण करणारी जान्हवी कपूरची सर्वत्र चर्चा असतानाच, तिची धाकटी बहीण खुशी कपूरची सुद्धा चर्चा सुरू झालीये. खुशी कपूर देखील चित्रपट क्षेत्रात लवकरच पदार्पण करणार आहे. आपल्या आईच्या पावलावर पाऊल टाकत जान्हवीनंतर आता खुशी ही अभिनय क्षेत्रातून तिच्या करिअरला सुरुवात करणार अशी चर्चा आहे. विशेष म्हणजे खुशी कपूरला देखील करण जोहर त्याच्या चित्रपटातून लाँच करणार आहे.

खुशी कपूरबरोबरच शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान देखील चित्रपट क्षेत्रात आपली ओळख बनवण्यासाठी सज्ज आहे. आर्यन खानसोबतच खुशी चित्रपट क्षेत्रात एन्ट्री करणार असल्याची माहिती आहे. करण जोहर खुशीसाठी योग्य पटकथेच्या शोधात आहे. सोशल मीडियावर खुशीची फॅन फॉलॉईंग वाढत चाललीये. खुशी आणि आर्यन यांना एकत्र लाँच करुन करण जोहर बॉलिवूडमध्ये नक्कीच धमाका करतील असं तरी दिसतंय.कलाक्षेत्रातील नामवंत कुटुंबातील खुशी आणि आर्यन त्यांच्या कुटुंबाचा वारसा पहिल्या चित्रपटातून पुढे नेतील ह्याचीच उत्सुकता सगळ्यांना असेल.शाहरूख खानची मुलगी सुहानाही आता बाॅलिवूडमध्ये एन्ट्री करणार आहेच. त्यात आता आर्यन खानही येतोय. आता पुढच्या काळात ही सेलिब्रिटीजची मुलं सिनेरसिकांना चांगली ट्रीट देतील, असं वाटतंय.जाने कहाँ गये वो दिन, आता उरल्या फक्त आठवणी

Trending Now