VIDEO : 'कौन बनेगा करोडपती 10'चा नवा प्रोमो पाहिलात का?

देवियो और सज्जनो... आठवलं का ? बरोबर. हा आवाज पुन्हा एकदा ऐकायला मिळणार आहे. कौन बनेगा करोडपतीचा 10वा सिझन लवकरच सुरू होणार आहे.

मुंबई, 25 जुलै : देवियो और सज्जनो... आठवलं का ? बरोबर. हा आवाज पुन्हा एकदा ऐकायला मिळणार आहे. कौन बनेगा करोडपतीचा 10वा सिझन लवकरच सुरू होणार आहे. आणि त्याचा प्रोमो रिलीज झालाय. यात आपल्या मुलाच्या शिक्षणाचा खर्च करण्यासाठी वडील जीवाचं रान करतात. अमिताभ त्यांना विचारतात, या शोमध्ये हरलात तर काय? त्यावर ते उत्तर देतात, तरीही लढणार. मग अमिताभ बच्चन म्हणतात, 'हालात को कोसोगे या हालात को पुछोगे कब तक रोकोगे.' केबीसी सर्वसामान्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देतं.केबीसीनं नेहमीच प्रेक्षकांची पसंती मिळवलीय. आणि प्रेक्षकांना अमिताभ बच्चनच होस्ट लागतात. एकदा शाहरूखनं हे काम केलेलं. पण त्यावेळी टीआरपी कमी झालेला. आता पुन्हा एकदा हा 10वा सिझन सुरू होतोय. स्पर्धकांचं तर सोडा, पण बिग बींच्या रोजच्या दर्शनानं प्रेक्षकांना करोडपती झाल्यासारखं वाटतं.वर्षानुवर्षे बिग बी अमिताभ बच्चन यांच्यामुळे केबीसी शो नव्या उंचीवर पोहचला आहे. बिग बींचा अनोखा अंदाज, शोमध्ये येणारे स्पर्धक, त्यांच्या बिग बींचा संवाद, शोमधून समोर येणाऱ्या विविध भावनिक गोष्टी यामुळे केबीसीने टीआरपीमध्ये अव्वल स्थान मिळवलं. केबीसीपुढे इतर रिअॅलिटी शोची जादू फिकी पडली. यात सलमानच्या बिग बॉस आणि इतर कॉमेडी तसंच सिंगिंग रिअॅलिटी शोचा उल्लेख करावा लागेल.

Trending Now