केबीसीमध्ये बिग बींवर 'या' वायुसेनेतल्या महिलेनं असा टाकला प्रभाव

करोडपती बनण्याचं स्वप्न प्रत्येक जण बघतं. केबीसीमध्ये ते पूर्णही होतं. पण त्यासाठी बरीच मेहनतही घ्यावी लागते. केबीसीची सुरुवात झाली ती बिग बींच्या कवितांनी. या कविता शोची युएसपी आहे. पहिल्या एपिसोडची स्पर्धक होती सोनिया यादव. सोनियाची सुरुवात चांगली झाली. तिनं पहिल्या पाच प्रश्नांची उत्तरं सहज दिली आणि 10 हजार रुपये कमावले. पाचव्या प्रश्नानंतर सहाव्या प्रश्नाला ती संभ्रमात पडली आणि त्यात तिनं 50.50 आणि आॅडियन्स पोल या दोन लाईफ लाईन वापरल्या.

सोनिया भारतीय वायुसेनेत होती. आपल्या छोट्या मुलीसाठी तिनं 10 वर्ष सेवा झाल्यावर निवृत्ती स्वीकारली. 12वा प्रश्न तिला कठीण जात होता. म्हणून तिनं तिथेच निरोप घेतला आणि 12 लाख 50 हजार रुपये जिंकले.

Trending Now