सोशल मीडियावरील अश्लिल फोटोंना वैतागली कविता कौशिक, उचलले मोठे पाऊल

एफआयआर या मालिकेतून सगळ्यांच्या भेटीला येणारी कविता कौशिक नेहमीच सोशल मीडियावर अपडेट असते. पण सध्या ही अभिनेत्री सोशल मीडियाच्या तिच्या अश्लिल फोटोंमुळे प्रचंड वैतागली आहे.

मुंबई, 30 ऑगस्ट : एफआयआर या मालिकेतून सगळ्यांच्या भेटीला येणारी कविता कौशिक नेहमीच सोशल मीडियावर अपडेट असते. पण सध्या ही अभिनेत्री सोशल मीडियाच्या तिच्या अश्लिल फोटोंमुळे प्रचंड वैतागली आहे. याविरोधात टीव्ही अभिनेत्री कविता कौशिकने मुंबई पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. एका अनोळखी व्यक्तीने तिच्या फोटोंना अश्लिलपणे एडिट करत त्यांना पॉर्न साईटवर पोस्ट केल्यावरून कविता कौशिकने पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. छोट्या पडद्यावर आपल्या अभिनयाच्या माध्यमातून पोहचलेल्या कविताने अशा अश्लिल प्रकाराविरुद्ध आवाज उठवला आहे.काही दिवसांआधीपासून कविता या अश्लिल फोटोंमुळे वैतागली होती. एका इसमाने तिचे फोटो अश्लिलपद्धतीने एडिट केले आणि ते सगळ्या सोशल साईट आणि पॉर्न साईटवर अपलोड केले होते, त्यामुळे यातून कविताच्या चाहत्यांच्याही तिला अश्लिल प्रक्रिया येत होत्या. याला कंटाळून तिने तिचं फेसबुक अकाऊंटही डिलीट केलं. पण आता या सगळ्यावर आवाज उठवत तिने पोलीस स्थानकात त्या व्यक्तिविरोधात तक्रार दाखल केली आहे. पोलिसही सायबर टीमच्या मदतीने ते फोटो कोणी आणि कुठून अपलोड केले याचा शोध घेत आहेत.एफआयआर या मालिकेतून चंद्रमुखी चौटाला या भूमिकेतून कविता कौशिकने मोठा स्टारडम मिळवला आहे. पण सध्या या प्रकरणामुळे ती प्रचंड त्रासात आहे. त्यामुळे आता पोलीस लवकरच या प्रकरणाचा तपास करून त्या व्यक्तीला ताब्यात घेईल याच्या अपेक्षेत कविता आहे.

 नववधूच्या वेशात कतरिना दिसली सलमानच्या आईसोबत, काय आहे मामला?

Trending Now