'या' अभिनेत्रीचं मानधन किती कोटी झालंय माहीत आहे?

करिना कपूर खानचा काही दिवसांपूर्वी वीरे दी वेडिंग सिनेमा आला. तैमुरच्या संगोपनात मग्न असलेल्या करिनाचा तो कमबॅक ठरला. सिनेमा बाॅक्स आॅफिसवर हिट ठरला, तशी करिनानं आपली किंमतही एकदम वाढवली. करिनानं या सिनेमासाठी ७ कोटी घेतले होते. करिनाला मागणीही वाढलीय. करण जोहरच्या तख्तमध्ये ती आहे. शिवाय अर्जुन कपूरबरोबर ती लाईफ इन मेट्रोचा सिक्वल करतेय.२००७मध्ये हा सिनेमा टाॅक आॅफ द टाऊन होता. आता करिनानं सिनेमासाठी आपली किंमत किती वाढवलीय माहीत आहे का?

करिना आई झाली तरीही तिची बाॅलिवूडमध्ये किंमत कमी झालेली नाही. ती आता घेतेय १० कोटी. दीपिका, प्रियांका या महागड्या अभिनेत्रींच्या यादीत तिचंही नाव आलं.ट

Trending Now