रणबीर,आलिया आणि जान्हवीचा येतोय ट्रॅंगल!

आता हे तिघं एका सिनेमात दिसतील, असं तुम्हाला कुणी सांगितलं तर? धक्काच बसेल ना? होय, करण जोहर हे करणार आहे.

मुंबई, 11 सप्टेंबर : बाॅलिवूडची यंग ब्रिगेड नेहमीच राॅकिंग असते. रणबीर कपूर, आलिया भट्ट, जान्हवी कपूर फॅन्सच्या गळ्यातला ताईतच बनलेत. आणि आता हे तिघं एका सिनेमात दिसतील, असं तुम्हाला कुणी सांगितलं तर? धक्काच बसेल ना?  होय, करण जोहर हे करणार आहे.त्याचं झालं असं की 'काॅलिंग करण 2' या शोमध्ये करण जोहरला एका श्रोत्यानं प्रश्न विचारला. 'कुछ कुछ होता है 2'चा सीक्वल निघाला तर कोणाला घ्याल? करणनं लगेचंच उत्तर दिलं, सिनेमात रणबीर कपूर, आलिया भट्ट आणि जान्हवी कपूर यांना घेईन. या तिघांचा ट्रँगल पाहायला नक्कीच प्रेक्षकांना आवडेल.आलिया आणि जान्हवीला करण जोहरनंच लाँच केलं. आलिया ' स्टुडंट आॅफ द इयर'मधून तर जान्हवी 'धडक'मधून पुढे आली होती. रणबीरबरोबर करणनं 'ऐ दिल है मुश्किल' आणि 'ये जवानी है दिवानी' सिनेमे केले होते.

करण जोहर अख्ख्या बाॅलिवूडचा मित्र आहे. अनेक जण त्याचा सल्ला घेतात. स्वत: अविवाहित असलेला करण जोहर सगळ्यांना सुखी रिलेशनशिपचे, सुखी लग्नाचे सल्ले देतोय. करणचा रेडिओ शो काॅलिंग सध्या चर्चेत आहे. या शोद्वारे तो सगळ्यांशी संवाद साधतोय. आणि असाच एक खाजगी सल्ला करणनं रणबीर कपूरला दिलाय.रणबीरनं या शोमध्ये करणला विचारलं, 'जर तुम्ही तुमच्या पहिल्या रिलेशनशिपमध्ये एक चूक करता आणि तीच चूक पुन्हा तुम्ही दुसऱ्या रिलेशनशिपमध्ये देखील करता तर ती सुधारण्यासाठी तुम्हाला काय केले पाहिजे ?'यावर करणनं ताबडतोब उत्तर दिलं, 'तुम्ही त्या नात्यातून लगेच बाहेर पडायला पाहिजे. तुम्ही एकच चूक नेहमी करत असाल, तर तुमच्यात काही कमतरता आहे. तेव्हा वेळीच सावध व्हायला हवं.'त्यानंतर रणबीरनं विचारलं, ' तू माझ्या गर्लफ्रेंडला काय सल्ला देशील?' यावर करण म्हणाला, 'तू जगातला सर्वात बेस्ट नवरा आहेस. आणि हा सल्ला मी तुझ्या गर्लफ्रेंडला कधीच दिलाय.'म्हणजे हे नक्की की रणबीरला गर्लफ्रेंड आहे आणि आलियाशिवाय ती दुसरी कोणी असणं शक्य नाहीय. त्यामुळे करणनं आधीच हा सल्ला देऊन टाकलाय तर!PHOTOS : तैमुरवरचा लाईमलाईट आता त्याच्या या गोड आतेबहिणीवर!

Trending Now