कपिल शर्माच्या शोला सोनी वाहिनीनं दिला निरोप

आता कपिल शर्मा शोच्या जागी कृष्णा अभिषेकचा ड्रामा कंपनी लावला जाईल. आणि कपिलच्या शोचे रिपिट एपिसोडस् रात्री 8 वाजता दाखवले जातील.

Sonali Deshpande
01 सप्टेंबर : बहुचर्चित कपिल शर्माचा शो सोनी वाहिनीनं बंद केलाय. कपिल आणि सुनील ग्रोव्हर यांच्या भांडणानंतर हा शो बंद होणार अशा खूप चर्चा रंगल्या. सरतेशेवटी हा शो बंद झालाच. अर्थात, सोनीनं कपिल शर्मा शो बंद करताना छोट्या ब्रेकनंतर पुन्हा एकदा हा शो परत येईल असं म्हटलंय.कपिल शर्माची तब्येत बरी नसते. त्यामुळे हा शो तात्पुरता बंद होतोय, असंही म्हटलंय. पण खरी कारणं वेगळी आहेत. कपिल आणि त्याच्या टीममध्ये वितुष्ट आल्यानंतर या शोचा टीआरपी कमी झाला. त्यामुळे वाहिनीनं हा निर्णय घेतलाय.आता कपिल शर्मा शोच्या जागी कृष्णा अभिषेकचा ड्रामा कंपनी लावला जाईल. आणि कपिलच्या शोचे रिपिट एपिसोडस् रात्री 8 वाजता दाखवले जातील.

'बादशाहो'च्या प्रमोशनसाठी अजय देवगण या शोच्या सेटवर आला होता आणि तिथे कपिल नव्हता. म्हणून तो रागावून परत गेला, अशीही बातमी आहे. आणि त्यानंतर शो बंद झाल्याची बातमी आली. हा योगायोग समजावा का?

Trending Now