#News18RisingIndia : मी मोदींची फॅन - कंगना राणावत

ती म्हणाली, 'मी मोदींची फॅन आहे. मी जास्त वर्तमानपत्र वाचत नाही. पण आपले पंतप्रधान एक सक्सेस स्टोरी आहे.'

Sonali Deshpande
20 मार्च : कंगना राणावत पंतप्रधान नरेंद्र मोदींची फॅन आहे. न्यूज18रायझिंग इंडियाच्या समिटमध्ये खुद्द कंगनाच हे कबूल केलं. ती म्हणाली, 'मी मोदींची फॅन आहे. मी जास्त वर्तमानपत्र वाचत नाही. पण आपले पंतप्रधान एक सक्सेस स्टोरी आहे. एका सर्वसामान्य व्यक्तीची महत्त्वाकांक्षा पूर्ण झाली. एक चहावाला आज देशाचे पंतप्रधान झालेत.ही फक्त त्यांचीच नाही तर लोकशाहीची जीत आहे. जग परिपूर्ण नाही, पण आपण त्याला बॅलन्स बनवू शकतो.'कंगना म्हणाली, तिला राजकारणात यायला नक्कीच आवडेल. पण तिला राजकारण्यांची फॅशन पसंत नाही. ती म्हणाली तिच्या ग्लॅमरसहित राजकारणात तिचा स्वीकार झाला तरच ती राजकारणात येईल.याआधीही कंगनानं मोदींचं कौतुक केलंय. फेब्रुवारीत ती पंतप्रधानांना भेटलीही होती. त्यामुळे कदाचित ती राजकारणात येईल, अशी चर्चा सुरू आहे.

 

Trending Now