कंगनाची ‘मणिकर्णिका’ का ओढून घेतेय पुन्हा पुन्हा वाद?

आता कंगनासाठी यामध्ये अजून एक अडथळा निर्माण झाला आहे तो म्हणजे चित्रपटाचं चित्रीकरण पूर्ण होण्याआधीच सोनू सूदने हा चित्रपट सोडलाय.

मुंबई, 2 सप्टेंबर :  नेहमी कुठल्या न कुठल्या कारणाने चर्चेत असलेली कंगना आता पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. तिचा आगामी चित्रपट ‘मणिकर्णिकाः द क्वीन ऑफ झांसी’ प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. यापूर्वी चित्रपटाच्या रिलीज डेटवरून खूप वाद झाला होता. आता कंगनासाठी यामध्ये अजून एक अडथळा निर्माण झाला आहे तो म्हणजे चित्रपटाचं चित्रीकरण पूर्ण होण्याआधीच सोनू सूदने हा चित्रपट सोडलाय.शनिवारी एका मुलाखतीत सोनूने चित्रपट सोडल्याचं कारण सांगितलं. यावेळी तो म्हणाला की, मणिकर्णिकाचे काही सीन्स परत रिशूट करण्याचा निर्णय चित्रपटाच्या दिग्दर्शक क्रिशने घेतला आहे. पण हा चित्रपट घेण्याआधीच मी रोहित शेट्टीचा ‘सिंबा’ चित्रपट स्वीकारला होता आणि त्यानुसार दोन्ही चित्रपटांना डेट्स दिल्या होत्या. आता या चित्रपटाच्या रिशूटसाठी माझ्याकडे वेळ नाही.त्याने क्रिशला हे देखील सांगितलं होतं की सिंबाचं शूट संपल्यानंतर तो मणिकर्णिकासाठी वेळ देऊ शकतो कारण त्यासाठी त्याला क्लिन शेवची गरज होती आणि ‘सिंबा’साठी त्याला बियर्ड लूक हवा होता.‘सिंबा’ला त्याने आधी कमिटमेंट दिली असल्याने त्याच्या समोर चित्रपट सोडणं हा एकच पर्याय  उरला होता.

VIDEO : धावत्या लोकलच्या दारात तरुणीची स्टंटबाजी

Trending Now