काजोल आणि करणमध्ये आता आॅल इज वेल!

बाॅलिवूडमध्ये प्रत्येक स्टार्सची एक स्टाइल असते. अनेकदा तो अॅटिट्युड वाटतो इतरांनी. पण या कलाकारांमध्येही अनेकदा खूप मैत्री असते.

मुंबई, 28 आॅगस्ट : बाॅलिवूडमध्ये प्रत्येक स्टार्सची एक स्टाइल असते. अनेकदा तो अॅटिट्युड वाटतो इतरांनी. पण या कलाकारांमध्येही अनेकदा खूप मैत्री असते. आता काजोल आणि शाहरूखची मैत्री तर सर्वश्रुत आहे. पण करण जोहर आणि काजोलचीही खूप घट्ट मैत्री होती आणि अचानक त्यांच्यात दुरावा निर्माण झाला होता. पण नुकताच काजोलनं स्पाॅटबाॅयला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं, ' आता आमच्यात काहीच प्राॅब्लेम नाही. सगळं ओके आहे.'कुछ कुछ होता है सिनेमापासून काजोल आणि करण जोहर चांगले मित्र बनले. अनेक मुलाखतीत दोघांनी आम्ही एकमेकांचे बेस्ट फ्रेंड आहोत असं सांगितलं होतं. करण, काजोल, शाहरूख यांचं एक त्रिकुट बनलं होतं. मग दुरावा का आला?2016मध्ये करण जोहरचा ऐ दिल है मुश्किल रिलीज होणार होता,  त्यावेळी अजय देवगणचे शिवाय सिनेमाही रिलीज होणार होता. करणनं शिवायचा रिव्ह्यू वाईट देण्यासाठी 25 लाख रुपये दिले, असा आरोप अजय देवगणनं केला होता.  त्यावरूनच काजोल आणि करणमध्ये दुरावा आला होता. पण आता आॅल इज वेल!

कळलेल्या माहितीनुसार करण जोहरनं शाहरूख-काजोलला स्क्रीप्ट ऐकवलंय. दोघंही त्यावर चर्चा करतायत. अजून सिनेमा साईन केलेला नाही. पण लवकरच प्रेक्षकांना काही तरी धमाका पाहायला मिळणार आहे, हे नक्की.PHOTOS : हेमामालिनी ते जान्हवी कपूर, लॅक्मे फॅशन वीकमध्ये स्टार्सचा जलवा

Trending Now