Sacred Games : बेस्ट सपोर्टिंग अॅक्टर जितू सांगतोय त्याचे ‘सॅक्रेड’ अनुभव

बेस्ट सपोर्टिंग अॅक्टरचा ‘आयरिल अवॉर्ड' जितेंद्र जोशीला मिळाला. नेटफ्लिक्सवरच्या सॅक्रेड गेम्समध्ये त्यानं साकारलेल्या काटकर या पोलीसाच्या भूमिकेसाठी त्याला पुरस्कार मिळाला. पुरस्कार स्वीकारताना काय म्हणाला जितू?

रिल मुव्ही अवॉर्डच्या यशानंतर यावर्षी News18.comच्या वतीने ‘आयरिल अवॉर्ड्स’ देण्यात आले. या कार्यक्रमात वेब सीरिजमध्ये सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्याचा पुरस्कार मराठमोळ्या जितेंद्र जोशीला मिळाला. नेटफ्लिक्सवरच्या ‘सॅक्रेड गेम्स’मधल्या कॉन्टेबल काटेकरच्या भूमिकेसाठी जितूने हा पुरस्कार पटकावला. ‘नसिरुद्दीन शहांना पाहून आम्ही मोठे झालो. त्यांच्यासोबत नामांकन मिळणं हाच माझ्यासाठी पुरस्कार आहे, असं मी नामांकनानंतरच आईला म्हणालो’, अशा शब्दांत जितेंद्रने अापल्या भावना व्यक्त केल्या. 

नामांकनानंतर Network18च्या स्नेहा बंगानींशी बोलताना जितेंद्र काय म्हणाला पाहा - मराठीत माझं नाव असलं तरी हिंदी चित्रपटसृष्टीसाठी मी अनोळखी चेहरा होतो. या भूमिकेनंतर अनेक दिग्दर्शकांनी संपर्क साधला पण अजून सशक्त असं काही हाती लागलेलं नाही. जितेंद्रला सॅक्रेड गेम्ससाठी काटेकर या पोलिस कॉन्स्टेबलच्या भूमिकेसाठी विचारण्यात आलं होतं. अनेक चित्रपटात त्याने पोलिसाची भूमिका साकारली असल्याने सुरुवातीला त्याने नकार दिला होता. नेटफ्लिक्सचा अनुराग कश्यपबरोबरचा हा मोठा प्रोजेक्ट असल्याने जितूने ऑडिशन दिली आणि विक्रमादित्य मोटवानींनी त्याची निवड केली. 

Trending Now