कॅन्सरवर मात करत इरफान खान करणार 'या' बायोपिकमध्ये काम

इरफान खान लवकरच राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेते दिग्दर्शक शुजित सरकारसोबत आपला नवा प्रोजेक्ट सुरू करू शकतो.

मुंबई, 3 सप्टेंबर : इरफान खानच्या वापसीकडे डोळे लावून बसलेल्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. लंडनमध्ये कॅन्सरसारख्या दुर्धर आजारावर उपचार घेत असलेला इरफान लवकरात लवकर कामावर परतू इच्छितोय. गेले काही दिवस न्यूरो इंडोक्राईन ट्यूमरसारख्या दुर्धर आजाराशी दोन हात करणारा अभिनेता इरफान खानच्या तब्येतीत आता सकारात्मक बदल होत आहे. डॉक्टरांच्या उपचारांना यश येत असून लवकरच इरफान भारतात परत येणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. या गंभीर आजारातून पूर्णपणे बाहेर झाल्यानंतर तो सिनेमात पुनरागमन करणार असल्याचे खुद्द इरफानने स्पष्ट केलं होतं.इरफान खान लवकरच राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेते दिग्दर्शक शुजित सरकारसोबत आपला नवा प्रोजेक्ट सुरू करू शकतो. क्रांतिकारी उधम सिंह यांच्या बायोपिकवर शुजित यांना चित्रपट बनवायचा आहे. या चित्रपटासंदर्भात इरफानसोबत शुजित यांची चर्चाही झाली होती. वर्षभरापूर्वीच इरफानने या चित्रपटासाठी होकार दिला होता.बॉलिवूडचे मनिषा कोइराला, अनूराग बसू यांसारख्या कलाकारांनी कर्करोगावर मात करून आयुष्याची सेकेंड इनिंग सुरू केली आहे. त्याचप्रमाणे इरफानने देखील त्याच्या आजारावर मात करून आता त्याच्या आयुष्यातील सेकेंड इनिंगची सुरूवात करणार आहे.

गेल्या अनेक महिन्यांपासून इरफान अमेरिकेत कर्करोगावर उपचार घेत आहे. तिसऱ्या केमोनंतर इरफानच्या प्रकृतीत सुधारणा दिसून येत आहे. सहा केमोथेरपी झाल्यावर पुन्हा एकदा कर्करोगाच्या सर्व चाचण्या करण्यात येतील. नुकत्याच एका मुलाखतीत इरफान म्हणाला की, भविष्याची कोणतीही काळजी न करता आणि कोणत्याही योजना न आखता मुक्तपणे जगण्यास सध्या मी प्राधान्य देत आहे.इरफान खान सांगतो, मी अनेक स्वप्नं आणि इच्छा आणि महत्त्वाकांक्षा उराशी बाळगून एका भरधाव ट्रेनने जात होतो आणि अचानक टीसी येऊन म्हणाला तुमचा स्टाॅप आलाय. आता तुम्हाला उतरावं लागेल. इरफाननं त्यावेळी लिहिलेल्या पत्रानं सगळ्यांच्या मनाचा ठाव घेतला होता.VIDEO : बीडच्या कारागृहात साजरा झाला कृष्ण जन्म सोहळा

Trending Now