स्वातंत्र्यदिनाच्या 'ग्लॅमरस' शुभेच्छा

बॉलिवूडच्या ताऱ्यांनीही वेगवेगळ्या प्रकारे ट्विट करून स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Chittatosh Khandekar
15 ऑगस्ट: आज भारताला स्वतंत्र होऊन 70 वर्ष पूर्ण झाली. हा दिवस आज देशभरात उत्साहाने साजरा केला जातोय. मग यात बॉलिवूडचे तारे मागे कसे राहणार? बॉलिवूडच्या ताऱ्यांनीही वेगवेगळ्या प्रकारे ट्विट करून स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.टॉयलेट एक प्रेमकथा या सिनेमामुळे सध्या चर्चेत आलेल्या अक्षय कुमारने सैनिकांचा फोटो शेअर करून शुभेच्छा दिल्या आहेत. शुभेच्छा देताना खूप काही झालंय पण अजून खूप काही करणं बाकीही आहे असंही तो म्हणाला आहे.

तर नवाझुद्दिन सिद्दिकीने या दिवसाला 'महापर्व' म्हणत या दिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

अमिताभ बच्चनने 10 सेकंदांचा एक छोटासा व्हिडिओ शेअर करून शुभेच्छा दिल्या आहेत.

तर विदेशात रमलेल्या प्रियांकानेही तिचा फोटो शेअर करून शुभेच्छा दिल्या आहेत. या फोटोत तिने तिरंग्याच्या रंगाची ओढणी घातली आहे.

तर थ्री इडियट्समधल्या व्हायरसने अर्थात बोमन इराणीने आपल्या आईची स्वातंत्र्यदिनाची आठवण सांगत शुभेच्छा दिल्या आहेत.

फरहान अख्तरने डेहराडूनच्या चेटवूड इमारतीसमोर फोटो काढून शुभेच्छा दिल्या आहेत.या इमारतीवर तिरंगाही फडकतो आहे.

तर एक कविता आणि स्वत:चा फोटो शेअर करून रितेश देशमुखने शुभेच्छा दिल्या आहेत.

तर किंग खाम शाहरूख खाननेही साध्या पण थेट शुभेच्छा दिल्या आहेत

Trending Now