हृतिकची बहिण सुनैना 'जिंदगी'तून करणार सकारात्मक विचारांचा प्रसार

हृतिक रोशनची बहिण सुनैना आता आपल्या एक नव्या संकल्पनेत भेटणार आहे. तिच्या आयुष्याचा अनुभव आपल्यासोबत शेअर करण्यासाठी ती आता ब्लॉग लिहणार आहे.

Renuka Dhaybar
23 एप्रिल : हृतिक रोशनची बहिण सुनैना आता आपल्या एक नव्या संकल्पनेत भेटणार आहे. तिच्या आयुष्याचा अनुभव आपल्यासोबत शेअर करण्यासाठी ती आता ब्लॉग लिहणार आहे. हृतिक रोशन त्याच्या कुटुंबातील सदस्यांच्या किती जवळ आहे हे तर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे.हृतिकची बहिण सुनैनाला तिच्या आयुष्यात आजवर अनेक अडचणींचा सामना करावा लागला. तिच्या प्रत्येक अडचणीत हृतिक तिच्या सोबत होता. तिचं लग्न अपयशी ठरलं आणि त्यानंतर तीला कॅन्सरनेही ग्रासलं, मात्र मोठ्या हिंमतीने ती या सगळ्यातून सावरली.सुनैना आता तिचा आयुष्यातील अनुभव एका ब्लॉगद्वारे मांडणार आहे. 'जिंदगी' असं या ब्लॉगचं नाव असून त्यातून सकारात्मक विचारांचा प्रसार करायचा निर्णय तीने घेतला आहे.

तिच्या या ब्लॉगचं हृतिकने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून कौतुक केलं आहे. हा ब्लॉग अनेकांना प्रेरणादायी ठरेल असंही त्यांने म्हंटलं आहे. 

Trending Now