अक्षयने दिलं चाहत्यांना अनोखं 'रिटर्न गिफ्ट'

बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारचा आज ५१ वा वाढदिवस. त्याचे लाखो चाहते आहेत जे त्याला आजच्या खास दिवसाच्या शुभेच्छा देतात. दरवर्षी अक्षय चाहत्यांना त्याच्या वाढदिवसाला काही न काही तरी रिटर्न गिफ्ट देतो. आज तर त्याने गोल्डन जुबली पार केली आहे. त्यामुळे हे वर्ष नक्कीच त्याच्यासाठी लकी ठरलंय. त्यामध्ये त्याचा आनंद द्विगूणीत करत त्याने त्याच्या आगामी 2.0 चित्रपटाचं एक खास पोस्टर रिलीज केलंय.

त्याने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर त्याचा फोटो पोस्ट करून चाहत्यांना आनंदी केलंय. 2.0 चित्रपटामध्ये अक्षय एका अनोख्या भूमिकेत दिसणार आहे. यामध्ये अक्षयसोबत रजनीकांत आणि एमी जॅक्सन यांची मुख्य भूमिका असणार आहे.

Trending Now