राम कदमांच्या 'त्या' ट्विटनं संतापला सोनाली बेंद्रेचा पती, सुनावले चार शब्द

गोल्डी बहलनं यावर संताप व्यक्त केलाय. तो म्हणाला, सोशल मीडियाचा वापर जबाबदारीनं करा. अफवेवर विश्वास ठेवून आणि त्या पसरवून संबंधितांना नाहक त्रास देऊ नका.

मुंबई, 9 सप्टेंबर : अभिनेत्री सोनाली बेंद्रे सध्या न्यूयाॅर्कला कॅन्सरवर उपचार घेतेय. भाजपचे आमदार राम कदम यांनी 7 सप्टेंबर रोजी दुपारी 1.50 च्या सुमारास एक टि्वट केलं होतं. या टि्वटमध्ये राम कदमांनी सोनाली बेंद्रे यांचं निधन झाल्याचं जाहीर केलं होतं. नंतर त्यांनी ते ट्विट डिलिट केलंही. पण तोपर्यंत त्या ट्विटचा स्क्रीन शाॅट अनेकांनी काढून ते व्हायरल केलं. अर्थातच, ही बातमी सोनालीचा पती गोल्डी बहल याच्यापर्यंत पोचली.गोल्डी बहलनं यावर संताप व्यक्त केलाय. तो म्हणाला, सोशल मीडियाचा वापर जबाबदारीनं करा. अफवेवर विश्वास ठेवून आणि त्या पसरवून संबंधितांना नाहक त्रास देऊ नका, असे आवाहन त्यांनी केले आहे. त्यांना टोला अर्थातच राम कदम यांच्यासारख्यांना आहे.राम कदमांनी आपल्याकडून चुकून टि्वट झालंय हे लक्ष्यात आल्यावर अर्ध्या तासानंतर त्यांनी ते टि्वट डिलिट केलं. आणि  'सोनाली बेंद्रे यांच्या निधनाबद्दल अफवा पसरवल्या जात आहेत. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होवो अशी मी प्रार्थना करतो' अशी सारवासारव करत नवीन टि्वट केलं होतं.

I appeal to all to please use social media more responsibly. Let us not believe in rumours and spread them, unnecessarily hurting the sentiments of those involved. Thank you.

— goldie behl (@GOLDIEBEHL) September 8, 2018काही दिवसांपूर्वी तिचा नवरा गोल्डी बहेलनं ट्विट करून सोनालीच्या खुशालीची माहिती दिली. तो म्हणतो, सोनालीला तुम्ही इतकं प्रेम दिलंत त्याबद्दल धन्यवाद. तिचे उपचार सुरू आहेत. त्यात कसलाच अडथळा येत नाहीय. पण हा प्रवास खूप मोठा आहे.सोनालीच्या आजारपणात तिचा नवरा, नणंद, मुलगा सगळे नातलग, मित्र मैत्रिणी तिच्या सतत सोबत असतात. आजारी माणसाला हा मोठा अाधार असतो. त्यामुळेच तिची मानसिक स्थिती एवढ्या आजारातही उत्तम राहतेय.काही दिवसांपूर्वी तिच्या तब्येतीची माहिती तिची नणंद सृष्टी आर्यानं दिली. सोनाली फार खंबीर असून ती कॅन्सरसारख्या दुर्धर आजाराशी मोठ्या नेटाने दोन हात करत असल्याचं तिने सांगितलं. त्यामुळे सोनालीची प्रकृती आता हळूहळू सुधारत असल्याचं स्पष्ट झालंय. सोनाली बेंद्रेच्या तब्येतीची काळजी प्रत्येकालाच आहे. त्यामुळे या बातमीनं सगळ्यांनी थोडा सुटकेचा श्वास सोडलाय.VIDEO: कोकणवासीयांच्या मेळाव्यातील राज ठाकरे यांचं संपूर्ण भाषण

Trending Now