दीपिका-रणवीरचं लग्न नोव्हेंबरमध्ये?

दीपिका आणि रणवीर या दोघांनीही त्यांच्या सपोर्ट स्टाफच्या पुढील तीन महिन्यांच्या सुट्टया रद्द केल्याचं समजतंय.

Sonali Deshpande
28 मे : सेलिब्रिटींची लग्न हे सर्वसामान्यांचा आवडता विषय. विराट-अनुष्काच्या लग्नानंतर गाजलं ते सोनम कपूरचं लग्न. सोनम कपूरच्या लग्नानंतर बॉलिवूडला दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंगच्या लग्नाचे वेध लागलेत. या दोघांचं लग्न कधी होणार याबाबत सध्या अनेक तर्कवितर्क लढवले जातायत.नोव्हेंबर महिन्यात हे लग्न पार पडेल अशाही शक्यता आहेत.यामागे कारणही तसंच आहे. दीपिका आणि रणवीर या दोघांनीही त्यांच्या सपोर्ट स्टाफच्या पुढील तीन महिन्यांच्या सुट्टया रद्द केल्याचं समजतंय. रणवीर सध्या त्याच्या आगामी सिम्बा सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. ते एका शेड्युलमध्ये संपावं असं रणवीरनं दिग्दर्शकाला सांगितलंय. या सिनेमाचं शूटिंग लग्नाआधी संपवण्यासाठीच हे सगळं चाललं नाहीये ना अशी चर्चा आता सुरू झालीय.

Trending Now