अखेर दीपिका-रणवीरच्या लग्नाची तारीख झाली फिक्स

बऱ्याच दिवसांपासून दीपिका आणि रणवीरच्या लग्नाची चर्चा सुरू होती. आत्तापर्यंत या बाबतीत दोघांकडून कुठलेच स्पष्टीकरण आलं नव्हते. मात्र आता त्यांनी यावरची चूप्पी सोडली आहे. दीपिका आणि रणवीरने त्यांच्या लग्नाची गाडी पुढे नेत, लग्नाच्या तारखेवर शिक्कामोर्तब केला आहे. बरं इतकंच काय तर त्यांच्या लग्नाची गेस्ट लिस्टदेखील त्यांनी प्रसिद्ध केली आहे. काही दिवसांपुर्वी अशी बातमी सगळीकडे पसरली होती की या दोघांनी त्यांच्या कुटुंबीयांसमवेत साखरपुडा केला. त्यानंतर असं समोर आलं की अनुष्का आणि विराट प्रमाणेच हे दोघे इटलीमध्ये लग्न करणार आहेत.

इटली हे दीपिका आणि रणवीरचे सर्वात आवडते ठिकाण आहे. त्यामुळे हा विवाहसोहळा इटलीमध्ये पार पडणार आहे. इटलीमध्ये लग्नकरून भारतात दोन रिसेप्शन ठेवले जाणार आहेत. त्यामधले एक मुंबईमध्ये आणि दुसरे दीपिकाच्या होमटाऊन बेंगलोरमध्ये.

Trending Now