एकेकाळी तरुणाईचं लाडकं 'चॅनल [V]' मोजतोय अखेरच्या घटका,लवकरच होणार बंद !

आता चॅनल [V] च्या जागी आता स्टार इंडियाचं एक कन्नड स्पोटर्स चॅनल सुरू होणार आहे.

Sachin Salve
24 नोव्हेंबर : आजपासून 20 वर्षांपूर्वी जेव्हा फेसबुक, युट्यूब नव्हते तेव्हा एक चॅनल तरुणाईच्या गळ्यातलं ताईद बनलं होतं. आज ते चॅनल शेवटच्या घटका मोजत असून लवकरच बंद होणार आहे...त्या चॅनलचं नाव आहे चॅनल व्ही (channal [V])महिरपी कंसात अर्थात [V] असा लोगो असलेलं खास गाण्यांचं चॅनल तुमच्या लक्षात असेलच. तरुणाईंला डोळ्यासमोर ठेऊन दररोज नवी गाणी, शो आणि सेलिब्रिटींच्या मुलाखती अशी मेजवानी चॅनल व्ही पुरवत होता.तरुणाईसाठी चॅनल [V] ने अनेक मनोरंजनात्मक कार्यक्रम केले. जुने, नव्या गाण्यासाठी हमखास चॅनल [V] पाहिलं जातं होतं. आता मात्र काळाच्या ओघात चॅनल [V] माघारी पडलं. आता चॅनल [V]  बंद होणार आहे.

चॅनल [V]  हा इंटरनॅशनल म्यूझिकल चॅनल फाॅक्स नेटवर्स ग्रुपचा भागिदार होता. 1994 ते 2002 पर्यंत चॅनल [V] चा स्टुडिओ हाँगकाँगमध्ये होता. मध्यंतरी काही काळासाठी चॅनल [V]  चा स्टुडिओ मलेशियाला हलवण्यात आला होता. या चॅनलवर हिंदी आणि इंग्रजी भाषेतील गाणी दाखवली जात होती.आता चॅनल [V] च्या जागी आता स्टार इंडियाचं एक कन्नड स्पोटर्स चॅनल सुरू होणार आहे.2015 पासून चॅनल [V]  चा टीआरपी कमालीचा घसरला होता. गेली दोन वर्ष चॅनल [V]  ने इतक मनोरंजन वाहिन्यांना टक्कर देण्यासाठी अनेक बदल केले. पण, आता चॅनल [V]  ने आता निरोप घेण्याची घोषणा केलीये. चॅनल [V]  बंद होणार या बातमीमुळे सोशल मीडियावर चाहता वर्ग भावूक झाला असून जुन्या आठवणींना उजाळा देत आहे.चॅनल [V]ची व्हीजे श्रुतीचं टि्वट...

Trending Now