सोनाली बेंद्रेनं लिहिलं मुलाला भावनिक पत्र

सोनाली बेंद्रेनं काही दिवसांपूर्वी तिला कॅन्सर असल्याचं ट्विट केलं आणि फिल्म इंडस्ट्री, तिचे चाहते हादरून गेले. सोनाली दर वेळी ट्विटरवर सर्व परिस्थती शेअर करते. आणि आता तिनं इन्स्ट्राग्रामवर आपल्या मुलाला रणवीरला पत्र लिहिलंय.

मुंबई, 19 जुलै : सोनाली बेंद्रेनं काही दिवसांपूर्वी तिला कॅन्सर असल्याचं ट्विट केलं आणि फिल्म इंडस्ट्री, तिचे चाहते हादरून गेले. सोनाली दर वेळी ट्विटरवर सर्व परिस्थती शेअर करते. आणि आता तिनं इन्स्ट्राग्रामवर आपल्या मुलाला रणवीरला पत्र लिहिलंय.  आपल्या मुलाचा फोटो पोस्ट करत सोनाली लिहिते, ' 12 वर्ष, 11 महिने आणि 8 दिवस आधी ज्या क्षणी रणवीर, माझ्या मुलाचा जन्म झाला त्या क्षणी माझा अॅमेझिंग मुलगा रणवीरनं माझं हृदयच त्याच्या नावे केलं होतं. त्यानंतर माझ्या आणि गोल्डीच्या आयुष्यात रणवीरचा आनंद आणि देखभाल हेच महत्त्वाचं ठरलं. आणि जेव्हा कॅन्सरनं माझ्या आयुष्यात प्रवेश केला तेव्हा आमच्या पुढे एक मोठा प्रश्न होता, तो म्हणजे रणवीरला याबद्दल कसं सांगायचं?

आम्हाला त्याची जेवढी काळजी होती, तेवढंच सत्य सांगायचं होतं. आम्ही आतापर्यंत त्याच्यापासून काही लपवलेलं नाही. आणि आताही सर्व काही खरं खरं सांगितलं. त्यानं सर्व ऐकून घेतलं आणि समजून घेतलं. आणि हे पाहूनच माझ्यात एक प्रकारची शक्तीच आली. आता अनेकदा तो माझा पालक बनतो. काय योग्य, काय अयोग्य ते मला सांगतो.मला असं वाटतं की अशा परिस्थितीत आपल्या मुलांना सत्य सांगावं. अशा वेळी त्यांच्या सोबत जास्त वेळ काढा. पण अनेकदा आपण मुलांना जीवनातलं सत्य सांगत नाही. ते लपवतो. आता रणवीरच्या सुट्ट्या सुरू आहेत. मी त्याच्याबरोबर आहे. त्याचा खोडकरपणा, खोड्या यामुळे माझं लक्ष त्याच्यात असतं. आम्ही एकमेकांची ताकद बनलोय.

Trending Now