दीपिकाचं आयुष्यात असणंच माझ्यासाठी सर्व काही - रणवीर

मनमोकळ्या रणवीरनंही तेवढ्याच खुलेपणानं आपलं आणि दीपिकाचं नातं उलगडून दाखवलं.

Sonali Deshpande
नवी दिल्ली, १७ मार्च : न्यूज१८ च्या रायझिंग इंडिया समिटच्या समारोपाच्या सत्रात आलेल्या अभिनेता रणवीर सिंग यांनी आपल्या उत्तरांनी आज धम्माल उडवून दिली. सगळ्यांना उत्सुकता होती ती रणवीर दीपिकासोबच्या नात्याबद्दल काय बोलतो याची. मनमोकळ्या रणवीरनंही तेवढ्याच खुलेपणानं आपलं आणि दीपिकाचं नातं उलगडून दाखवलं.दीपिकासोबतची माझी रिलेशनशिप खूप खास आहे. तिचं आयुष्यात असणंच माझ्यासाठी सर्वकाही आहे असं सांगत रणवीरनं आपल्या मनाचा कप्पा हळुवार मोकळा केला. रिलेशनशिप म्हणजे परस्परांचं प्रेम. या या संबंधांत अभिनयाच्या स्तरावर ती खूपच पुढे असून मी तिच्याकडून खूप काही शिकतो, दीपिका मात्र माझ्या अभिनयाचं कौतुक करत नाही असंही त्यानं सांगितलं.पद्मावतचा अनुभव खूप काही शिकवून गेला असंही त्यानं स्पष्ट केलं.

Trending Now