प्रियांका चोप्राचा दात किडलाय का?

सध्या प्रियांका चोप्रा निक जोन्समुळे खूप प्रसिद्ध झालीय. पण तिच्या फॅन्ससाठी एक वाईट बातमी आहे. ती म्हणजे प्रियांका डेंटिस्टकडे गेलीय.

मुंबई, 12 जुलै : सध्या प्रियांका चोप्रा निक जोन्समुळे खूप प्रसिद्ध झालीय. पण तिच्या फॅन्ससाठी एक वाईट बातमी आहे. ती म्हणजे प्रियांका डेंटिस्टकडे गेलीय. तसा फोटो तिनं इन्स्टाग्रामवर टाकलाय. त्यात ती दातांची ट्रीटमेंट घेतेय. हा फोटो शेअर करताना तिनं लिहिलंय, मला डेंटिस्टकडे जायला आवडत नाही. पण मी माझ्या डेंटिस्टचं कौतुक करते. माझ्यासाठी डेंटिस्ट कधीही उपलब्ध असल्यानं मला अडचण येत नाही.

प्रियांकानं आपला फनी फोटो इन्स्टाग्रामवर टाकलाय. त्याला पाच लाखांच्या वर लाईक्स मिळाल्या. प्रियांकाचे अडीच कोटींपेक्षा जास्त फाॅलोअर्स आहेत.प्रियांका निकसोबत भारतात आली होती. त्यावेळी ती गोव्याला गेली होती. तेव्हा निकसोबतचे तिचे फोटोज व्हायरल झाले. ते दोघं आकाश अंबानी आणि श्लोका यांच्या प्री एन्गेजमेंट पार्टीला गेले होते. त्यावेळी प्रियांकानं निकचा हात धरला होता.

Trending Now