या कलाकारांना डान्स शिकवणाऱ्या अभिजीत शिंदेने केली आत्महत्या

बॉलिवूडचा प्रसिद्ध डान्सर अभिजीत शिंदे याने आत्महत्या केली आहे. बुधवारी सकाळी घरातल्या पंख्याला गळफास घेऊन अभिजीतने आत्महत्या केली आहे. अभिजीत शिंदेने बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर, अभिनेता सलमान खान, रणवीर सिंग, तुषार कपूर यांच्या समवेत अनेत दिग्गजांसोबत काम केलं आहे.

सिनेसृष्टीतल्या अनेक मोठ्या कलाकारांना त्याने आपल्या तालावर नाचवलं आहे. पण आज अशा तडफदार कलाकाराने आपलं आयुष्य संपवलं आहे. आत्महत्या करण्याआधी अभिजीतने एक चिठ्ठीही लिहली होती. त्यात त्याने त्याच्या बँकेचे अकाऊंट आपल्या मुलीच्या नावे केलं असल्याचं लिहलं आहे. प्रसिद्ध डान्सर आणि रॅपर अभिजीत शिंदेची पत्नी त्याला सोडून गेल्यामुळे तो मोठ्या डिप्रेशनमध्ये होता. गेल्या तीन महिन्यांपासून अभिजीत बायको तिच्या आईकडे राहते. अभिजीतला 3 महिन्याची मुलगी आहे आणि पण मुलीला भेटण्यासाठी त्याच्या बायकोने त्याला सक्त नकार दिला आहे. त्यामुळे तो खूप डिप्रेशनमध्ये होता. हाती कोणतंही काम नसल्याने त्याला पैशांचेही टेन्शन होते आणि याच सगळ्या नैराश्यातून त्याने आत्महत्या केली असल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. त्याच्या अशा या अकाली जाण्याने संपूर्ण सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे.

Trending Now