Photos: जगातील सर्वात सुंदर जागी दीपिका- रणवीर करणार लग्न

विराट आणि अनुष्कासारखे दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंगही त्यांच्या ‘सिक्रेट वेडिंग’ची जोरदार तयारी करताना दिसत आहेत. त्यांनी ‘सिक्रेट वेडिंग’साठी इटली देशाला प्राधान्य दिले आहे. पण विराट- अनुष्कापेक्षा या दोघांच्या लग्नाचे स्थळ फार वेगळे आहे. विरुष्काच्या लग्नाच्या स्थळाचे फोटो तर तुम्ही पाहिलेच आहेत. आज आम्ही तुम्हाला रणवीर आणि दीपिकाच्या लग्नाच्या स्थळाचे फोटो पाहणार आहोत. याचवर्षी २० नोव्हेंबरला रणवीर- दीपिका इटली येथील लेक कोमो येथे डेस्टिनेशन वेडिंग करणार असल्याचे म्हटले जात आहे. ही जागा विरुष्काच्या स्थळापेक्षा खूप वेगळी असून सुंदरही आहे. लेक कोमो हा इटलीतील सर्वात मोठा तलाव आहे. एवढेच नाही तर जगातील सर्वात खोल तलावांपैकी लेक कोमो हा एक तलाव आहे. रोमन काळापासून श्रीमंत लोकांचे लेक कोमो हे सर्वात आवडीचे स्थळ राहिले आहे.

इथल्या वास्तू या खास आर्टिस्टिक पद्धतीने बांधल्या गेल्या आहेत. इथे व्हिला ओलमो, व्हिला सेरबेलोनी आणि व्हिला कारलोटोसारखे जग प्रसिद्ध पॅलेस आहेत. या फोटोमध्ये तुम्ही लेक कोमो येथील ग्रॅण्ड हॉटेल पाहू शकता. २०१४ मध्ये द हफिंग्टन पोस्टने लेक कोमोला आलिशान व्हिला आणि सुंदर गावांमुळे या जागेला जगातील सर्वात सुंदर तलावांमध्ये समाविष्ट करुन घेतले होते. लेक कोमोजवळ लेको, वारेना, मेनाजियो, कोमो आणि बेलाजिया ही पाच मुख्य शहर आहेत. या शहराची एकूण लोकसंख्या ८५ हजारांहून जास्त नाही. यामुळेच इथे गर्दी अजिबात नाही. यासाठीच हे जगातील महागड्या हॉलीडे डेस्टिनेशनपैकी एक आहे. इंटरनेटवरून मिळालेल्या माहितीनुसार, लेक कोमो हे फक्त सुंदर स्थळ नसून शॉपिंगसाठीही ते तेवढेच प्रसिद्ध आहे.

Trending Now